ठाकरे सरकारमुळे अडलेले काम शिंदेंमुळे पूर्ण झाले, सदा सरवणकर यांचा खुलासा

ठाकरे सरकारच्या काळात कामांसाठी अडवणूक केली जायची, मात्र शिंदे सरकारच्या काळात कामे लागलीच मार्गी लागतात, असं दादर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले. वीर सावरकर मार्ग सुशोभिकरण आणि वरळी मतदारसंघातील सुशोभिकरण विषयबाबत ते बोलत होते. या विकासकामांसाठी ठाकरे सरकारकडून अडवणूक केली जात होती. मात्र, शिंदे सरकारने तत्काळ या कामांसाठी निधी मंजूर केल्याने कामांना गती येणार आहे.

हेही वाचा शिंदे गटाकडून मुंबईसाठी रणनीती; दादरमध्ये मुख्यालय बांधणार, जागोजागी शाखा उभारणार

सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भक्तांना सुविधा उपलब्ध करून देणे, वीर सावरकर मार्ग सुशोभिकरणासाठी ठाकरे सरकारकडे २५ कोटींचा निधी मागितला होता. मात्र, निधी देणार नाही, असं ठाकरे सरकारने एमएमआरडीएला पाठवलेल्या पत्रात सांगितले. परंतु, हीच मागणी २२ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असता एमएमआरडीएला निधी मिळालाही. याबाबत ११ ऑगस्ट रोजी एमएमआरडीएने निधी मिळाला असल्याचं पत्र पाठवल्याचे सरवणकर म्हणाले.

निधी मिळाला असल्याने आता कामाला गती मिळणार आहे. शिंदे गटाने अशीच मदत कायम केली तर वरळीपेक्षा दादर मतदार संघात अधिक विकासकामे होतील, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – शहीद म्हणजे नक्की कोण, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीने व्याख्याच सांगितली

मुंबईत शिंदे गटाचं मुख्यालय

एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आता मुंबईतच नवं मुख्यालय उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचं मुख्यालय दादरमध्येच बांधणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी टफ फाईट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आजच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.