घरमुंबईCoronaVirus: मध्य रेल्वेने तयार केल्या ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली

CoronaVirus: मध्य रेल्वेने तयार केल्या ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली

Subscribe

ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली पूर्णपणे तयार झाल्यावर भायखळ्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयाला संपूर्द

जगभरात प्रचंड वेगाने पसरत असणारा कोरोना व्हायरस हजारो लोकांचे बळी घेत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मुंबईत सातत्याने वाढत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या साहित्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे युद्धपातळीवर काम करत आहे. आयसोलेशन कोच तयार करण्याबरोबर आतापर्यंत ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली तयार करून रेल्वे हॉस्पिटलमध्ये देण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेच्या मेल-एक्सप्रेस प्रवासी डब्याचे आयसोलेशन कोचमध्ये रूपांतर करून ते कोरोनाबाधित रुग्णांकरिता वापरण्याचे आव्हानात्मक कार्य मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे वर्कशॉप करत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे वर्कशॉपमध्ये आतापर्यत १५० हून अधिक आयसोलेशन कोच तयार करण्यात आले आहे. यासह रुग्णालयात लागणाऱ्या साहित्य आणि उपकरणाचा तुटवडा भासू नये, याकरिता सुद्धा मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपने देखील कंबर कसली असून अत्यंत कमी वेळात ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉलींची निर्मिती केली आहे. भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालय येथे या ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली देण्यात आल्या आहेत.

देशावर आलेल्या कोरोना व्हायरच्या संकटाला तोंड देण्यास भारतीय रेल्वे सज्ज आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय रेल्वेचे कर्मचारी अहोरात्र काम करत असून परळ वर्कशॉपने अत्यंत कमी कालावधीत ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली निर्माण केल्या आहेत. या सर्व ट्ऱॉली रेल्वे हॉस्पिटलमध्ये देण्यात आल्या आहेत. त्याचे हे कार्य फार कौतुकास्पद आहे.

– शिवाजी सुतार (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे)

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आहे मात्र अशा कठीण परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, यासाठी अहोरात्र रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी काम करत आहे. इतकेच नाही तर कोरोनाबाधित रुग्णांकरिता मेल-एक्सप्रेस प्रवासी डब्यांचे आयसोलेशन कोचमध्ये रूपांतर करण्याचे काम देखील सुरु आहे.

- Advertisement -

तीन टप्प्यांत तयार ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली!

मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपने या ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली तीन टप्यात तयार केल्या आहे. पहिल्या टप्यात तयार केलेल्या या १० ट्रॉलीला सात दिवसाचा कालावधी लागला. तर दुसऱ्या टप्यातील १० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉलीचा संपुर्ण सेट तयार करण्याकरिता फक्त पाच दिवसांचा कालावधी लागला आहे. उर्वरित ३० ट्रॉली या सहा दिवसात तयार करण्यात आल्या. त्यानंतर या ट्रॉली पूर्णपणे तयार झाल्यावर भायखळ्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयाला संपूर्द करण्यात आल्या आहे.


CoronaVirus: तबलीगीच्या कार्यक्रमात उपस्थितीत राहिलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे १४ गावं सील!
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -