घरमुंबईभिवंडीत ३२ उमेदवारांसाठी ६४ नामनिर्देशन अर्ज वितरीत

भिवंडीत ३२ उमेदवारांसाठी ६४ नामनिर्देशन अर्ज वितरीत

Subscribe

२ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून आजच्या (गुरुवारी) तिसऱ्या दिवशी ३२ उमेदवारांनी ६४ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले आहेत. त्यातील नितेश रघुनाथ जाधव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी शहरातील उपविभागीय कार्यालयांत प्रशासकीय कामकाज सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात भिवंडी लोकसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या काम सुरु आहे. २ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून आजच्या (गुरुवारी) तिसऱ्या दिवशी ३२ उमेदवारांनी ६४ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले आहेत. त्यातील नितेश रघुनाथ जाधव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या लोकसभा मतदार संघात नितेश यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज भरण्याचा मान मिळवला आहे.

उमेदवार वाट पाहताहेत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताची

नितेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वप्रथम शहरातील नझराना येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होवून त्यांच्या चरणी आपल्या निष्ठा अर्पण केल्या आणि प्रांत कार्यालयात दाखल होऊन नामांकन दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत गिरीश पाटील, कपिल ढोले, विनोद जाधव, गणेश भोईर, जयवंत बांगर, दशरथ कथोरे, योगेश गायकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात तरूणांचा अधिक सहभाग दिसून आला. फळेगांव (कल्याण ) येथील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नितेश यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अश्वासन दिले आहे. कल्याण, मुरबाड, शहापूर, बदलापूर, वाडा, कुडूस या परिसरात नितेश यांचा सामाजिक कार्याच्या माध्यमातून चांगलाच दांडगा संपर्क असल्याने लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर या निवडणूकीसाठी प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजपकडून कपिल पाटील, देवेश (बबलू ) पाटील, ठाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख तथा जि. प. बांधकाम समिती सभापती सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे वंचित-बहुजन आघाडीचे डॉ.अरुण सावंत, सपा, बसपाचे डॉ. नुरुद्दीन अंसारी, खान्देश सेनेचे सुहास बोन्डे, अपक्ष योगेश कथोरे आणि कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील आदी प्रमुख उमेदवारांनी नामांकन अर्ज खरेदी केले आहेत. मात्र हे सर्व उमेदवार गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्ताची वाट पाहत असून ९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सरतेशेवटी गर्दी वाढणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मतदारांना जागृत करण्यासाठी भिवंडीत सह्यांची मोहीम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -