घरमुंबईमतदारांना जागृत करण्यासाठी भिवंडीत सह्यांची मोहीम

मतदारांना जागृत करण्यासाठी भिवंडीत सह्यांची मोहीम

Subscribe

मतदानाचा दिवस म्हणजे अनेकदा सुट्टीचा दिवस असल्याची भावना लोकांमध्ये असते. मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी एक विशेश मोहीम राबवण्यात आली.

संपूर्ण देशभरात १७ व्या लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र निवडणूक म्हटलं की बहुतांश सुशिक्षित नागरिक मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एंजॉय करण्यासाठी बाहेरगांवी पिकनिकला निघून जात असतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर विपरित परिणाम होत असतो. हि निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी असल्याने मतदार सुशिक्षित असो अथवा अशिक्षित पण मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

काय आहे नवी मोहीम

मतदान करून देश घडवण्यासाठी हातभार लावला पाहिजे. या दृष्टीने भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या निर्देशाने भिवंडी प्रांत अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका फलकावर मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम सुरु करून नागरिकांना ‘या दिवशी भारत देशाचा कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून मी नक्की मतदान करणार …. हे मी माझ्या स्वाक्षरीने येथे नमूद करीत आहे.’ असे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून सह्यांची मोहिम सुरु केली आहे.या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी २३ – भिवंडी लोकसभा मतदार संघात सोमवार दि.२३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी व भारत देश सुजलाम, सुफलाम होण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी मतदारांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -