घरमुंबईअन्याय झालेल्या महिलांच्या पाठिशी मी कायम खंबीरपणे उभी आहे

अन्याय झालेल्या महिलांच्या पाठिशी मी कायम खंबीरपणे उभी आहे

Subscribe

#metoo मोहीमेबद्दल अभिनेत्री ऐश्वर्या राय ने देखील वक्तव्य केले. २००२ मध्ये ऐश्वर्याने सलमान विरोधात आवाज उठवला होता.

बॉलिवूडमध्ये #metoo मोहीम सुरु झाल्यानंतर कलाकारां विरोधात आरोपाचे सत्र सुरुच आहे. तनुश्रा-नानापाटेकर यांच्या प्रकरणानंतर अनेक जणांवर या मोहीमेअंतर्गत आरोप लागले. अनेक कलाकारांनी यावर वक्तव्य केले आहे. यामध्ये आता बॉलिवूड डिवा ऐश्वर्या राय बच्चन हीनेही वक्तव्य केले आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्लॅटफॉर्मसाठी ऐश्वर्याने कौतुक केलं आहे. पहिल्यापासून मी याच मुद्यावर बोलत आहे आणि या पुढेही बोलणार असे ऐश्वर्याने म्हटले आहे. लैंगिक अत्याचार बॉलिवूडमध्ये काही नवीन गोष्ट नाही मात्र आता याची गंभीरता लक्षात येते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या प्रचारामुळे हे शक्य झाले असल्याचेही ऐश्वर्या बोलली.

ऐश्वर्याने सांगितले की, “अन्यायाबद्दल वाचा फोडणाऱ्या महिलेचे नाव आणि तिच्या सम्मानाला सुरक्षा मिळणे गरजेचे आहे. #metoo मोहीमेला समर्थन मिळते आहे ही चांगली गोष्ट आहे. मी यापूर्वीही महिलांवर होणाऱ्या अन्यायाविषयी माझं मत ठामपणे मांडत आले आहे यापुढेही मांडत राहिन. ज्यामहिलेवर अन्याय झाला आहे तिच्या पाठिशी मी कायम खंबीरपणे उभी आहे.”

- Advertisement -

ऐश्वर्यालाही झाला होता मानसिक त्रास

साल २००२ मध्ये ऐश्वर्याने अभिनेता सलमान खान विरोधात आवाज उठवला होता. ऐश्वर्या आणि सलमान दरम्यान प्रेम संबध होते मात्रनंतर ते विभक्त झाले होते. यानंतर एक प्रेस रिलीज जाहीर करण्यात आली होती ज्यात सलमानने ऐश्वर्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे सांगण्यात आले होते. सलमान बरोबर कोणत्याची चित्रपटात काम करण्यासाठी ऐश्वर्याने नकार दिला होता. सलमानने त्याच्यावर लागले सर्व आरोप फेटाळले होते. २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न झाल्यानंतर हा प्रकार थांबला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -