घरCORONA UPDATECoronaEffect: अंबरनाथ एमआयडीसीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १५ कोटी जमा

CoronaEffect: अंबरनाथ एमआयडीसीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १५ कोटी जमा

Subscribe

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ एमआयडीसीतील कारखानदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरीव मदत केली आहे.

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ एमआयडीसीतील कारखानदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरीव मदत केली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १५ कोटीहून अधिक निधी जमा झाले आहेत. याबद्दल आमदार बालाजी किणीकर यांनी सर्व कारखानदारांचे आभार मानले असून उर्वरित कारखानदारांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरघोस मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरघोस मदत करावी याकरता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांनी अॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांच्यासोबत बैठक घेऊन अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरघोस मदत केली. यामध्ये एएसबी इंटरनॅशनल कंपनीने १० कोटी इतका निधी दिला असून इतर कंपन्यांनी ५ कोटीहून अधिक निधी जमा केला असल्याची माहिती सोमवारी झालेल्या बैठकीत तायडे यांनी दिली. या बैठकीत ज्या कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत केली अशा सर्व कारखानदारांचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आभार मानले. तसेच अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील मदत न केलेल्या उर्वरित कारखानदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरघोस मदत करावी, असे आवाहन केले.

- Advertisement -

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना लॉकडाउनमुळे उपासमारीचा फटका बसू नये, याकरता ठाकूर पाडा, जांभिवली आणि फणसीपाडा याठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी किचनचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. आमदार किणीकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या कम्युनिटी किचनमार्फत दररोज हजारो कामगारांना जेवण दिले जाते. यामध्ये माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि ‘आमा’चे अध्यक्ष उमेश तायडे, पदाधिकारी तसेच नारायण मिसाळ व त्यांचा परिवार आणि फणसीपाडा येथील ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा असल्याचे आमदार किणीकर यांनी सांगितले.

नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजनेमध्ये सहकार्य करून ही योजना सफल करण्यात खारीचा वाटा उचलू, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अरविंद शिवलिंग वाळेकर आणि अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर यांनी केल्यानंतर आज अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे स्वतः नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह अंबरनाथ शहरातील सुमारे १२६ सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापारी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधीत” धनादेश जमा करून सुमारे १४ लाख ४७ हजार ५४७ रुपयांचा निधी जमा करत खारीचा वाटा उचलला आहे.

- Advertisement -
नगराध्यक्षा मनिषा वाळेकर

अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे जे संकट आले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून नागरिकांना दिलासा देत आहेत. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उत्तम काम करत आहेत. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाखाली मी नगराध्यक्षा या नात्याने आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”ला मदत करण्याकरता अंबरनाथकरांना आवाहन केले होते, या आवाहनाला अंबरनाथकरांनी प्रतिसाद दिला. सुमारे ११ लाखांपर्यंत निधी जमा होईल असा अंदाज आमचा होता. परंतू त्यापेक्षाही जास्त निधी जमा झाला आहे, असेही नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी सांगितले.

हेही वाचा –

पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले १६ जण निगेटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -