घरमुंबईमांजरीला १६ मजल्यावरुन फेकले

मांजरीला १६ मजल्यावरुन फेकले

Subscribe

ठाणे येथे एका रहिवाशांनी मांजरीला १६ व्या मजल्यावरुन फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवराम पांचाळ (६४) या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तींनी मांजरीला जिवंत जाळून क्रौर्याची परिसीमा गाठल्याचा धक्कादायक प्रकार ओशिवरा येथे घडल्याचे उघकीस आले होते. अशीच एक घटना ठाणे येथे घडल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. ठाणे येथील कासारवडवली या परिसरात शेजाऱ्याच्या घरातील पाळीव मांजर वारंवार फ्लॅटमध्ये शिरत असल्याने त्या त्रासाला कंटाळून त्या मांजरीला १६ व्या मजल्यावरुन फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवराम पांचाळ (६४) या व्यक्तीला अटक करुन नंतर जामिनावर सुटका केली आहे.

नेमके काय घडले?

ठाण्यातील कासारवाडी परिसरात एव्हरेस्ट कंट्रीसाईड कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या गनी शेख (६५) यांनी सोनू नावाची पार्शियन मांजर पाळली होती. ही मांजर वारंवार शेजारी राहणाऱ्या शिवराम पांचाळ यांच्या घरी जायची. पांचाळ यांच्या घरी बाळ असल्याने त्यांना त्या बाळाच्या सुरक्षेची चिंता सतावत असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे शिवराम पांचाळ यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

या मांजरीच्या मृत्यूनं मालक शेख यांना मोठा धक्का बसला आहे. इमारतीखाली रक्ताच्या थारोळ्यात मांजरीचा मृतदेह पडला होता. हे पाहून शेख यांना मोठा धक्काच बसला आहे. तसेच त्यांनी मांजरीचा मृतदेह उचलून आपल्या घरी घेऊन गेले. त्यावेळी घरातील इतर आठ मांजरी आणि एका लॅब्राडोर जातीच्या श्वानानं मांजरीच्या मृतदेहाभोवती घोळका केला होता. तेथून कोणताही प्राणी हटण्यास तयार नसल्याची माहिती शेख यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.

अशी उघडकीस आली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख यांच्या शेजारच्या घरात काम करणाऱ्या महिलेनं पांचाळ यांना मांजरीला घेऊन जाताना पाहिलं होतं. मांजर त्यांच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत होती. मात्र मांजरीची धडपड असफल ठरली. त्यादरम्यान या महिलेने मांजरीला काही करु नका अशी विनंती करत त्यांना थांबवण्याचा पर्यंत देखील केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पांचाळ यांनी रागातच त्या मांजरीला १६ व्या मजल्यावरुन फेकून दिले.

- Advertisement -

घरात पाळलेल्या प्राण्यांवरुन पांचाळ नेहमीच आमच्या घरच्यांशी भांडण करायचे. वर्षभरापूर्वी मुंब्रा हायवेवर एका हॉटेलजवळ मांजर जखमी अवस्थेत सापडली होती. त्यावेळी तिला दत्तक द्या, अशी विनंती मी हॉटेल मालकाला केली. त्यानंतर मी तिला घरी आणलं आणि उपचार करुन बरं केलं. तेव्हापासून ती माझ्या घरातील एक सदस्यच झाली होती.  – गनी शेख, मांजरीचा मालक


वाचा – ओशिवरा येथे मांजरीला जिवंत जाळलं

वाचा – मांजराऐवढे गोंडस वासरु


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -