घरमुंबईअंधेरीत तीन कोटीचे कर्ज दिलेल्या फ्लॅटची विक्री करुन फसवणूक

अंधेरीत तीन कोटीचे कर्ज दिलेल्या फ्लॅटची विक्री करुन फसवणूक

Subscribe

बोगस दस्तावेजच्या आधारे एका व्यावसायिकाला तीन कोटी रुपयांचे कर्ज देऊन त्यासाठी तारण ठेेवलेल्या फ्लॅटवर बोगस दस्तावेज सादर करुन बँकेतून चार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये हार्दिक नितीन गोठी, नॅन्सी हार्दिक गोठी ऊर्फ नॅन्सी मुकेश मेहता, राजेश डहाणूकर व इतरांचा समावेश आहेत. अटकेच्या भीतीने हार्दिक गोठी आणि नॅन्सी गोठी यांनी दिडोंशी सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्याची सुनावणी शुक्रवारी 14 जूनला होणार आहे. दरम्यान त्यांच्या अटकपूर्व जामिनाला वर्सोवा पोलिसांनी विरोध केला असून या दोघांनी बोगस दस्तावेज सादर करुन तक्रारदार व्यावसायिकासह बँकेची फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

यातील तक्रारदार सखाराम बाळकृष्ण नाईक (60) हे अंधेरी येथे राहत असून त्यांच्या मालकीचे दोन फ्लॅट आहेत. त्यांचा बांगलादेशात कपड्याचा व्यवसाय असून ते कपडे अमेरिकेत निर्यात करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांना व्यवसायासाठी तीन कोटी रुपयांची गरज होती, त्यामुळे त्यांनी त्यांचा ओळखीचा प्रॉपटी ब्रोकर अंकुश शिंदे याला कर्जाविषयी विचारणा केली होती. तसेच कर्जासाठी त्यांचा फ्लॅट गहाण ठेवण्याची तयारी दर्शविली होती. अ‍ॅग्रीमेंटही केलेत्यानंतर अंकुश शिंदेने त्यांची ओळख आशिष शर्माशी करुन दिली होती. यावेळी आशिषने राजेश डहाणूकर ही व्यक्ती फ्लॅटवर त्यांना तीन कोटी रुपयांचे खाजगी कर्ज देईल असे सांगितले. 7 जून 2017 रोजी आशिष शर्मा हा त्यांचा घरी आला. त्याने त्यांच्याकडून पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिले, तसेच दोन्ही फ्लॅटचे सेल ऑफ अ‍ॅग्रीमेंटवर सह्या घेतल्या. यावेळी तिथे राजेश आणि हार्दिक गोठी असे दोनजण होते. राजेशने हार्दिक हा त्याचा भागीदार आहे. त्याच्या नावावर अनेक प्रॉपटी असल्याने तो हार्दिकसोबत त्यांचे मेमोरॅण्डम ऑफ अंडरस्टॅडिंग करार करीत असल्याचे सांगितले. या करारात सखाराम नाईक यांनी राजेशकडून एक वर्षांसाठी तीन कोटी रुपये दोन टक्के व्याजदरावर घ्यावे, ही रक्कम एक वर्षांत व्याजासहीत परत केल्यानंतर हा करार रद्द करण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते.

- Advertisement -

वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा
सर्व काही सुरळीत सुरु असतानाच 9 सप्टेंबर हार्दिक हा त्यांच्या घरी आला. हा फ्लॅट राजेशने त्याला विकला असून तो फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी आल्याचे सांगितले. या घटनेने सखाराम नाईक यांना धक्काच बसला होता. त्यातच हॉर्दिकने त्याचा मॅनेजर राजेश रावळ याला नाईक सोसायटीच्या कार्यालयात पाठवून सखाराम नाईक यांचा फ्लॅट हार्दिक यांनी विकत घेतला असून त्याचा ताबा लवकर मिळावा असे सांगितले. मात्र सोसायटीने अशा प्रकारे कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. याबाबत सोसायटीने बँकेत बोगस सोसायटीचे एनओसी बनविल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -