घरमुंबईआंतरजातीय विवाह केलेल्यांचा घेणार शोध, वाद मिटविणार; समिती स्थापन

आंतरजातीय विवाह केलेल्यांचा घेणार शोध, वाद मिटविणार; समिती स्थापन

Subscribe

नोंदणीकृत व अनोंदणीकृत विवाह व धार्मिक स्थळी झालेले विवाह. आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह. पळून केलेले विवाह यांची माहिती घेण्याचे काम ही समिती करणार आहे. तसेच ही जोडपी कुटुंबियांच्या संपर्कात आहेत का याची माहिती घेणे व हे जोडपे संपर्कात नसल्यास त्यांच्याकडून कुटुंबियांची माहिती घेणे. कुटुंबियांचा विवाहाला विरोध असल्यास त्यांचे समपूदेशन करणे. त्यांच्यातील वाद मिटवणे ईत्यादी कामे ही समिती करणार आहे. 

मुंबई : आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची नोंद ठेवणारी समिती मंगळवारी राज्य सरकारने स्थापन केली. १३ सदस्यांची ही समिती असून महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा या समितीचे अध्यक्ष आहेत. अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांच्यासह नांदेड येथील वकील या समितीचे सदस्य आहेत.

नोंदणीकृत व अनोंदणीकृत विवाह व धार्मिक स्थळी झालेले विवाह. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह. पळून केलेले विवाह यांची माहिती घेण्याचे काम ही समिती करणार आहे. तसेच ही जोडपी कुटुंबियांच्या संपर्कात आहेत का याची माहिती घेणे व हे जोडपे संपर्कात नसल्यास त्यांच्याकडून कुटुंबियांची माहिती घेणे. कुटुंबियांचा विवाहाला विरोध असल्यास त्यांचे समपूदेशन करणे. त्यांच्यातील वाद मिटवणे ईत्यादी कामे ही समिती करणार आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाजपच्या अनेक आमदार आणि नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज्यात वारंवार लव्ह जिहादच्या घटना घडत असल्याचा दावा भाजपच्या आमदारांनी केला आहे. यात लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीतील तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबने हत्या केल्यानंतर या मुद्द्यावर खूप चर्चा झाली. श्रद्धा वालकरची हत्या हा लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी जोर धरत होती.

बाल व महिला कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरजातीय विवाहांचा तपशील ठेवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही समिती मंगळवारी स्थापन करण्यात आली आहे. बाल व महिला कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा हे या समिती अध्यक्ष आहेत. बाल व महिला कल्याण सचिव तसेच आयुक्त, बाल व महिला कल्याण सह सचिव व उपायुक्ता हे या समितीचे सदस्य आहेत. अॅड. साळशिंगिकर यांच्यासह नांदेड येथील अॅड. योगेश देशपांडे हेदेखील या समितीचे सदस्य आहेत.

- Advertisement -

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -