घरमुंबईआपले सरकार आले की सगळे बंधनमुक्त होते, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

आपले सरकार आले की सगळे बंधनमुक्त होते, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

भाजप आमदार राम कदम यांनी आयोजीत केलेल्या दही हंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. आपले सरकार आले की सगळे कसे खुले खुले होते. आता गोवींदा ही जोरात, गणपती ही जोरात, नवरात्रोत्सव ही जोरात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

काय म्हणाल देवेंद्र फडणवीस –

- Advertisement -

आपले सरकार आले की सगळे कसे खुले खुले होते. आता गोवींदा ही जोरात, गणपती ही जोरात आणि नवरात्रोत्सव ही जोरात होतो. काल मुख्यमंत्र्यांनी घोषना केली. आता तुम्ही केवळ गोवींदा नाही तर तुम्ही खेळाडू देखील आहात. गोवींदाचा सहासी खेळात समावेश करण्यात आला आहे. तुम्हाला आता सर्व सुविधा मिळणार आहेत. राज्य सरकार प्रो गोवींदा स्पर्धा आयोजित करणार आहे.

आताच राम भाऊंच्या नेतृत्वात विकासाची हंडी फोडली. या हडीतील विकासीच फूल शेवटच्या मानसापर्यंत आपण घेऊन जाणार आहोत. तुम्ही गृह निर्माण प्रकल्प घेऊन या. तारखी तुम्ही ठरवायची मान्यता देण्याचे काम माजे असेल, असे ते म्हणाले. जनतेचे सरकार आले आहे. हे मुठभर लोकांचे सरकार नाही. हे गरीबांचे सामान्य मानसांचे सरकार आहे. ही हंडी फ़ुटल्यानंतर त्यातील लोणी आणि मलई प्रत्येका पर्यंत पोहोचवण्याची काम आपले सरकार निश्चीत करेल, असे ते म्हणाले.

- Advertisement -

 मुख्यमंत्री काय म्हणाले –

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदे आज उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोविंदांना संबोधून भाषण केलं. “शेतकरी, कष्टकऱ्यांप्रमाणेच हे सरकार गोविंदांचंही आहे. दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली. ५० थर लावले होते. गुवाहाटीला जायचं आहे? गुवाहटीला जाऊया. मुंबई, सूरत व्हाया गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊया,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -