घरमुंबईउल्हासनगर महासभेत जेवण, चहा पिण्यास मज्जाव

उल्हासनगर महासभेत जेवण, चहा पिण्यास मज्जाव

Subscribe

महापौर पंचम कलानी यांच्या या निर्णावर नगरसेवकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेच्या दिवशी नगरसेवक, अधिकारी यांना जेवण देण्यात येत होते. मात्र यापुढे महासभेत जेवणास तसेत चहा पिण्यास मज्जाव करण्याचा निर्णय महापौर पंचम कलानी यांनी घेतला आहे. तसे पत्र त्यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले असून नगरसेवकांना देखील आवाहन केले आहे.

महापौरांच्या दालनात जेवण करा

पुणे,पनवेल,कल्याण-डोंबिवली आदी महानगरपालिकांमध्ये महासभेच्या दिवशी सभागृहात जेवणाचा प्रकार होत नाही. तो अपनास्पद समजला जातो. महासभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असते अशा वेळी विषय भरकटू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. महासभेच्या दिवशी जेवणाची वेळ ठरवा. आणि आपापल्या किंवा महापौर, स्थायी समिती यांच्या दालनात येऊन जेवण करण्याचे आवाहन महापौर पंचम कलानी यांनी केले आहे. तसेच या निर्णयाचे पालन करण्याची विनंतीसुद्धा त्यांनी यावेळी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरातील अतिधोकादायक इमारत सील; १४ कुटुंबाना काढले बाहेर

जेवण बंद केले तर फरक पडत नाही

उल्हासनगरमध्ये सर्वपक्षीय ७८ व स्वीकृत ५ असे ८३ नगरसेवक आहेत. मुळात इतर महानगरपालिकांमध्ये महासभेची वेळ ही सकाळी ११ च्या सुमारास असते. उल्हासनगर महापालिकेत मात्र सायंकाळी ४ ची वेळ असते. क्वचितचवेळी महासभा सायंकाळी ४ च्या पूर्वी असते. सायंकाळची वेळ असल्याने बहुतांश नगरसेवक, नगरसेविका दुपारचे जेवण आटोपून महासभेत येतात. त्यामुळे जेवण बंद केले तर काही फरक पडत नाही. अशा प्रतिक्रिया काही नगरसेवकांनी व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -