घरताज्या घडामोडीबोरिवली - मिरा भाईंदर महापालिका अभियंत्याच्या गाडीवर गोळीबार, बालंबाल बचावले

बोरिवली – मिरा भाईंदर महापालिका अभियंत्याच्या गाडीवर गोळीबार, बालंबाल बचावले

Subscribe

बोरिवली नॅशनल पार्कजवळ मिरा भाईंदर महापालिकेच्या अभियंत्याच्या गाडीवर आज, बुधवारी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. दोन अज्ञातांकडून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून महापालिका अभियंता बचावले आहेत. घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलीस तसेच कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस उपायुक्त दाखल झाले असून तपास केला जात आहे.

माहितीनुसार, बोरिवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात युटर्न घेत असताना मिरा भाईंदर मनपा कार्यकारी अभियंता दीपक खामबीट यांच्या गाडीवर गोळीबार झाली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरून आले आणि त्यांनी गाडीवर गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजे तपासण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

गोळीबार झालेल्या घटनास्थळापासून काही अंतरावर भाजप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे जुने घरे आहे. त्यामुळे या गोळीबाराचा संबंध दरेकरांसोबत लावला जात होता. मात्र पोलिसांनी या घटनेशी दरेकरांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – सचिन वाझेच्या हाऊस कस्टडीची याचिका न्यायालयाने फेटाळली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -