घरमुंबईCoronaVirus: बोरीवलीमधील रुग्णालयात निकृष्ट दर्जाची पीपीई किट

CoronaVirus: बोरीवलीमधील रुग्णालयात निकृष्ट दर्जाची पीपीई किट

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवठादारांकडून महापालिकेची दिशाभूल करत फसवणूक

महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील कोरोना विषाणूचा बचाव करण्यासाठी डॉक्टरांना पीपीई किट देण्यात येत आहे, असे असले तरी काही रुग्णालयांमध्ये पुरवठा केलेले किट निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती समोर येत आहे. बोरीवलीतील कस्तुरबा रोड क्रमांक दोनमधील रुग्णालयाला पुरवलेली पीपीई किट निकृष्ट दर्जाची असल्याने तेथील डॉक्टरांनी ते परत पाठवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवठादारांकडून महापालिकेची दिशाभूल करत फसवणूक केली जात असल्याची बाब समोर येत आहे.

कोरोना संकटावेळी डॉक्टरांची फसवणूक

बोरीवली पूर्व येथील कस्तुरबा क्रॉस रोड नंबर २ वरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जात असून यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे येथील डॉक्टरांसाठी महापालिकेच्यावतीने पीपीई किट, हातमोजे, मास्क आदींचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु यापैकी पीपीई किट अत्यंक पातळ असून याचा दर्जा निकृष्ट असल्याने येथील डॉक्टरांनी या किट परत पाठवल्या आहेत. महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत या पीपीई किटची खरेदी करण्यात आली होती. परंतु पुरवठादाराने हे किट निकृष्ट दर्जाचे पाठवल्याने कोरोना संकटाच्यावेळी एकप्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब समोर आली.

किटला मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

भाजपचे माजी नामनिर्देशित नगरसेवक व माजी आरोग्य समिती सदस्य गणेश खणकर यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून याची पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा एक मोठा घोटाळा असून जो कोणी पुरवठादार आहे, त्याच्यावर कारवाई केली जावी. तसेच या पीपीई किटला मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खणकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


Make in India: गुजरातमध्ये बनलं स्वदेशी PPE किट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -