घरमुंबईमेट्रो ३ मार्गावर ३१ वा ब्रेकथ्रू

मेट्रो ३ मार्गावर ३१ वा ब्रेकथ्रू

Subscribe

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन द्वारे आज सीएसआयए टी-१ (आंतरदेशीय विमानतळ ) स्थानक येथे भुयारीकरणाचा ३१वा टप्पा पार पडला. पॅकेज-६ च्या टेराटेक निर्मित तापी -१ या टनेल बोअरिंग मशिनद्वारे सहार ते सीएसआयए टी-१(आंतरदेशीय विमानतळ ) पर्यंतचे १.५ किमी अंतर ४४९ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले.यासाठी एकूण १०८० रिंग्सचा वापर करण्यात आला.

“सीएसआयए टी-१(आंतरदेशीय विमानतळ ) हे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून दररोज एक लाखापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करणे अपेक्षित आहे. सीएसआयए टी-१ स्थानक आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळाना जोडले जाणार आहे व त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होईल”, असे मुं.मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले.

- Advertisement -

सीएसआयए टी-१ स्थानकाचे एकूण ५५% काम पूर्ण झाले आहे. सीएसआयए टी-१ (आंतरदेशीय विमानतळ), सीएसआयए टी-२ (आंतरराष्ट्रीय विमानतळ) व सहार रोड स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज -६ चे एकूण ८५% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ८७% भुयारीकरण व ६०% बांधकाम पूर्ण झाले आहे.
सध्या एकूण ७ टीबीएमद्वारे विविध भागात भुयारीकरण सुरू असून येत्या काही महिन्यात आणखी काही भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण होणे अपेक्षित आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -