घरताज्या घडामोडीMumbai Rain: अरबी समुद्रात अडकले १५ मच्छीमार; तटरक्षक दलाची नौका दाखल

Mumbai Rain: अरबी समुद्रात अडकले १५ मच्छीमार; तटरक्षक दलाची नौका दाखल

Subscribe

अरबी समुद्रात ४० मैलावर एका नौकेत १५ मच्छिमार अडकल्याचे समोर आले आहे. त्यांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाची नौका घटनास्थळी दाखल झाली आहे.

अरबी समुद्रात ४० मैलावर एका नौकेत १५ मच्छिमार अडकल्याचे समोर आले आहे. त्यांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाची नौका घटनास्थळी दाखल झाली आहे. समुद्र खवळलेला असल्याने त्यांची नौका कोणत्याही क्षणी बुडण्याची शक्यता आहे. नौका बुडण्याच्या स्थितीत असताना देखील मच्छीमार नौका सोडण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नौकाचे भाग आढळले

गोराई जवळ बुडालेल्या नौकाचे मंगळवारी काही भाग तटरक्षक दलाच्या विमानाला आढळले आहेत. तर सध्या बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी वरळीतून नौका पोहोचली आहे.

- Advertisement -

येत्या २४ तासात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडी, मुंबईने वर्तविली आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाडा भागातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढले. पावसाचा हा जोर पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे. येत्या ७२ तासांत कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, पूर्वानुमानानुसार उत्तर खाडीमध्ये आज कमी दाब तयार होणार असून परिणामी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आजही राज्यासह मुंबईत जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Live Mumbai Rain: विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -