घरमुंबईओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दायवरुन राज्य सरकारला विरोधकांनी घेरले आहे. यातच महाविकास आघाडीचा घटकपक्ष काँग्रेसने सरकारला इशारा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याशीवाय मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

- Advertisement -

ओबीसी आरक्षणावरून काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याची दखल घेऊन नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. यात राज्यातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे म्हटले आहे.

हेही वाचा – मध्य प्रदेशच्या निर्णयामुळे राज्यात ओबीसी आरक्षणाच्या आशा पल्लवित

- Advertisement -

यावेळी फडणवीस सरकार असताना 2017 पासून ओबीसींच्या राजकीय अधिकारांवर घाला घालण्यात आला. फडणवीस सरकारपासून ओबीसी समाजला ग्रहण लागले आहे. आजही ते संपलेले नाही, म्हणून महाराष्ट्र ओबीसी समाजात आक्रोश आहे. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल आणि ओबीसी संघटना निवेदन मला दिले ते मी मुख्यमंत्र्यांना पाठवले, असे नाना पटोले यांनी सांगीतले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -