घरठाणेओबीसी आरक्षण : राष्ट्रवादीने केला जल्लोष

ओबीसी आरक्षण : राष्ट्रवादीने केला जल्लोष

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. हे आरक्षण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगामुळेच मिळाले असल्याचा दावा करत डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला.

हेही वाचा – आज मी मुख्यमंत्री नसलो तरी…, ओबीसी आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

- Advertisement -

ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश आले आहे, असे नमूद करत ओबीसी सेलचे शहराध्यक्ष गजानन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या उपस्थितीत फटाके फोडून, ढोलताशांचा गजरात जल्लोष करण्यात आला. यावेळी गजानन चौधरी यांनी, ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरुवातीपासून प्रयत्न केले. केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोग नेमून डेटा गोळा करण्याचे काम केले. महाविकास आघाडी सरकारने लढलेल्या कायदेशीर लढाईला अखेर यश मिळाले आहे, असे सांगितले.

हेही वाचा – इतर आरक्षणाचे प्रश्नही आता सुटतील, चंद्रकांत पाटलांचा विश्वास

- Advertisement -

यावेळी परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, हाॅकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, दिनेश सोनकांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -