घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक

Petrol Diesel Price: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक

Subscribe

मुंबईत पेट्रोलच्या किंमती ११० रुपयांच्या पुढे

सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. पेट्रोलच्या किंमतींनी आज नवा उच्चांक गाठला आहे. आज डिझेलच्या किंमती ३४ पैशांवरुन ३७ रुपयांवर आल्या आहेत तर पेट्रोलच्या किंमती या ३१ पैशांवरुन ३५ पैशांवर आल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी देशभरात शंभरी ओलांडली आहे. मुंबईत मात्र सातत्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमती ११० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य मुंबईकर होरपळून निघाला आहे. जाणून घ्या मुंबईसह देशातील इतर प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर.

- Advertisement -

मुंबई

पेट्रोल – ११०.७५ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०१.४० रुपये प्रति लीटर

दिल्ली 

पेट्रोल – १०४.७९ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९३.५२ रुपये प्रति लीटर

- Advertisement -

कोलकत्ता

पेट्रोल – १०५.४३ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९६.६३ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०२ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९७.९३ रुपये प्रति लीटर

मुंबई, दिल्ली, कोलकत्ता,चेन्नई या प्रमुख शहरांप्रमाणेच, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिसा या राज्यातही पेट्रोल डिझेलच्या किंमती १०० रुपयांहून अधिक झाल्या आहेत. आधी केवळ पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली होती मात्र मागील आठवड्यातच डिझेलच्या किंमती ही शंभरी पार गेल्या आहेत. मुंबईत पेट्रोल डिझेलच्या किंमती तुलनेने सर्वाधिक पहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमती जीएसटी कक्षात आणण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता मात्र पेट्रोल डिझेलच्या किंमती जीएसटी कक्षात आणण्यासाठी सरकार उत्साही असल्याचे दिसून आले नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमती एसटी कक्षात आल्याने १०० रुपयांवर गेलेल्या किंमती ६०-७० रुपयांपर्यंत आल्या असत्या.


हेही वाचा – १४ ऑक्टोबरनंतर खाद्य तेलाचे दर गडगडणार, मोदी सरकारचे मोठा निर्णय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -