घरमुंबईसंजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची मातोश्रीच्या प्रवेशद्वारात 'गळाभेट'

संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची मातोश्रीच्या प्रवेशद्वारात ‘गळाभेट’

Subscribe

राऊतांची सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले होते.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( sanjay raut) यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ते ठाकरे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) स्वतः संजय राऊत यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. खासदार संजय राऊत मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर आले तेव्हा आदित्य ठाकरेंनी राऊतांना कडकडून मिठी मारली आणि त्यांचे स्वागत केले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीचा क्षण तिथे असलेल्या कॅमेराने कैद केला.

बुधवारी 9 नोव्हेंबर 2022 रोजी संजय राऊत यांची जामिनावर तुरूंगातून सुटका झाली. राऊतांची सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले होते. शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसत होता. आर्थर रोड तुरुंगापासून ते संजय राऊत यांच्या निवसास्थानापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर भांडूप येथील घराजवळ शिवसैनिकांना संजय राऊत यांनी संबोधित केले. ‘आपण मरेपर्यंत शिवसेनेत राहणार असे संजय राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांना सांगितले’. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत आज गुरुवारी ठाकरे कुटुंबियांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले.

- Advertisement -

sanjay raut

संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर ठाकरे कुटुंबीय हे भक्कमपणे संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे होते. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी संजय राऊत यांच्या मातोश्री आणि कुटुंबातील इतर सदस्यांची भेटसुद्धा घेतली होती. नवरात्रौत्सवात ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी जात असतानाही रश्मी ठाकरे (rashmi tahckeray) यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

- Advertisement -

…पण त्यांनी गद्दारी केली नाही
संजय राऊत यांची बुधवारी सुटका झाल्यानंतर आदित्य ठाकरे माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हणाले ‘संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच पण त्याच सोबत बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक देखील आहेत. उगाचच नाव लावून ते फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं गेलं पण त्यांनी गद्दारी केली नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले. संजय राऊत हे पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले’. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -