घरमुंबईगृहमंत्री बनलेत पुजारी; शरद पवार यांची अमित शाह यांच्यावर टीका

गृहमंत्री बनलेत पुजारी; शरद पवार यांची अमित शाह यांच्यावर टीका

Subscribe

खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावरुन सध्या तर्कविर्तक केले जात आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले, प्रत्यक्ष काम करणारा व कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. कोल्हापुरातील सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. त्यामुळे जे खासदार, आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. त्यांना जनतेच्या भावना काय आहेत हे निवडणुकीत कळेल.

कोल्हापूरः राम मंदिर कधी बांधून पूर्ण होणार, हे पुजाऱ्यांनी सांगणे अपेक्षित आहे. असे असताना त्यांचे काम सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढुळ झाले आहे. द्वेषाचे राजकारण सुरु आहे. तुला तुरुंगात टाकेन. तुझा जामीन रद्द करतो, अशी भाषा राजकीय नेते करत आहे. अशी भूमिका घेणे राजकीय नेत्याला शोभत नाही. असे टोकाचे बोलणे योग्य नाही.

- Advertisement -

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर शरद पवार म्हणाले, भाजपने राहुल गांधी यांच्याविषयी चुकीचा प्रचार केला होता. भारत जोडो यात्रेने राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारण्यास नक्कीच मदत झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही यात्रा केवळ काॅंग्रेसची राहिली नाही. सर्वसामान्यांचा या यात्रेला पाठिंबा मिळला आहे. महाराष्ट्रात ही यात्रा आली तेव्हा सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे यात्रेत सहभागी झाले होते.

खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावरुन सध्या तर्कविर्तक केले जात आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले, प्रत्यक्ष काम करणारा व कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. कोल्हापुरातील सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. त्यामुळे जे खासदार, आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. जनतेच्या भावना काय आहेत हे त्यांना निवडणुकीत कळेल.

- Advertisement -

उत्तम व चांगले काम करणाऱ्या राज्यपालांची महाराष्ट्राला परंपरा आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदाची प्रतिष्ठा राखली नाही. ते सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही, असेही शरद पवार म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत, या अजित पवार यांच्या वक्तव्याला पुन्हा एकदा शरद पवार यांनी पाठिंबा दिला. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणणे काहीही चुकीचे नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरु आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे अभिनंदनच करायला हवे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

रिपब्लिकन पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्यात काहीच हरकत नाही. खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार पाडण्यासाठी काही नियोजन केले असेल तर त्याची माहिती घेताे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -