घरमुंबईईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे? - हितेंद्र ठाकुरांचा शिवसेनेला टोला!

ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे? – हितेंद्र ठाकुरांचा शिवसेनेला टोला!

Subscribe

निवडणुका आल्या की यांचे सुरू. ईडीची फाईल लवकरच ओपन करणार. ईडीची धमकी सुरू. पण ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? मी जेलमध्ये जाऊन आलोय. भुजबळांची कोठडी खाली आहे, तिथे जाऊन राहीन. घाबरायला मी उद्धव ठाकरे नाही तर हितेंद्र ठाकूर आहे. पोटनिवडणुकीत कोथळा बाहेर काढायला निघाले होते, मला वाटले पुन्हा बाळासाहेब अवतरले की काय? पण हे तर चक्क म्याव निघाले, ती म्याव म्हणजे ‘माननीय उद्धव’ ठाकरे आहे. बाळासाहेबांचा पोरगा कसा मर्दासारखा वागला पाहिजे, पण न बोललेलेच बरे, अशा रोखठोक शब्दात बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

आपलं महानगरशी बोलताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. सध्या आमदार ठाकूर यांचा नालासोपार्‍यामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून या जहरी टीकेला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याची सर्वांना उत्सुकता आहे. यापूवर्ींही भाजपचे खासदार किरिट सोमैय्या यांनी फेबु्रवारी 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले होते. तसेच याबाबत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (एसीबी) तक्रारही केली होती. आता पुन्हा दोन वर्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून ‘ईडी’चा आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे पालघर निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि बविआमध्ये कलगीतुरा रंगणार आह

- Advertisement -

लोकसभा पोटनिवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार सुरु असून पालघर मतदारसंघात भाजपमधून शिवसेनेत आलेले विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची लढत बविआचे उमेदवार आणि माजी खासदार बळीराम जाधव यांच्याशी आहे. पालघरचे मतदान जसजसे जवळ येत आहे, तसे आरोप-प्रत्यारोपही वाढत आहेत. ‘आपलं महानगर’शी दूरध्वनीवरुन बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेना रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप केला. निशाणी पळवून निवडणुका जिंकता येत नाही. तसे असते तर 1990 मध्ये मी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक काँग्रेसमधून लढलो. निशाणी होती हाताचा पंजा. त्यानंतरची 19९5 ची निवडणूक चष्मा निशाणीवर लढलो.

‘चष्मा’ फ्री सिम्बॉल झाल्याने नंतर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने आम्हाला शिट्टी ही निशाणी दिली. त्या शिट्टीवरही मी दोन निवडणुका लढलो आणि जिंकलोही. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने रडीचा डाव खेळत शिट्टी निशाणी बहुजन महापार्टीच्या राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांना हाताशी धरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिरावून घेतली. शिट्टी निशाणी देण्यास निवडणूक आयोगाने आम्हाला नकार दिला. याबाबत आम्ही कायदेशीर लढाई सुरु केली असून आता आयोगानेच आम्हाला रिक्षा ही निशाणी दिली आहे. त्यावरही भाजपकडून आक्षेप घेतला जात आहे, यावर हसावे की रडावे हे कळत नाही, असा मिश्किल टोला ठाकूर यांनी लगावला.

- Advertisement -

चष्मा निशाणी मिळाल्यावर दोन दिवसांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी निशाणी पोहोचवली. त्यानंतर शिट्टी आणि आताही रिक्षा निशाणी घरोघरी पोहोचवली आहे. भाजप म्हणतेय की निवडणुकीच्या दिवशी रिक्षावर बंंदी घालावी कारण आचारसंहितेचे उल्लंघन आहे. यावर बोलताना आमदार ठाकूर म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच विरोधी उमेदवार पराभवाने भयभीत झाला आहे. आमची रिक्षा निशाणी म्हणून बंदीसाठी अर्ज, तक्रारी करताहेत. नशीब मी रेल्वे निशाणी घेतली नाही. ती निशाणी घेतली असती तर देशातील रेल्वे बंद करा अशी मागणी भाजपने केली असती, अशी कोटी हितेंद्र ठाकूर यांनी विरोधी पक्षाच्या मागणीवर केली.

आपल्या पक्षातील तालुका अध्यक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते मागील पोटनिवडणुकीत विकले गेले होते, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. तो ही व्हिडीओ सध्या राज्यभर व्हायरल झाला आहे. यावरही ठाकूर यांना विचारले असता, त्यांनी पुन्हा त्याच वाक्याचा पुनरुच्चार करत मी जे बोललो, ते बोललो आणि खरे बोललो आहे, खरं बोलायला पण एक धमक लागते, मी हितेंद्र ठाकूर आहे. जे बोलतो ते करतो आणि खरे तेच बोलतो, असा पुनरुच्चारही त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केला.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपत आलेल्या राजेंद्र गावित यांच्यासाठी चार मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे मातब्बर नेते यांनी पालघरमध्ये तळ ठोकला होता. आताही तेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारमधील गुंडगिरी संपवण्याची भाषा केली आहे. पाच वर्षे तुमची सत्ता आहे. पण उगाचच भीती दाखवू नका. मी बाकीच्यांसारखा भिणार नाही. कितीही भाषणे ठोका, कारवाई करा यावेळी बविआची रिक्षाच घराघरातून बाहेर पडेल असा विश्वासही त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केला.

वसई, नालासोपार आणि विरार हा बविआचा बालेकिल्ला आहे. या किल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी शिवसेना -भाजपाने मोठी ताकद पणाला लावली आहे. पण काहीही झाले तरी इथले रहिवाशी सुज्ञ आहेत. वसई-नालासोपारा आणि विरारचा विकास कुणी केला हे सर्वांना माहित आहे. कुणामुळे अच्छे दिन आले हे ही सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे शिवसेना अणि भाजपच्या कुठल्याही भुलथापांना इथली जनता बळी पडणार नाही, असे सांगत पाच टर्म आमदार काय उगाच बनवला का, असा प्रतिसवालही त्यांनी केला.

निवडणुका आल्या की यांचे सुरू. ईडीची फाइल लवकरच ओपन करणार. ईडीची धमकी सुरू. पण ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? मी जेलमध्ये जाऊन आलोय. भुजबळांची कोठडी खाली आहे, तिथे जाऊन राहीन. घाबरायला मी उद्धव ठाकरे नाही तर हितेंद्र ठाकूर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -