Eco friendly bappa Competition
घर मुंबई दोघांच्याही दसरा मेळाव्याला माझ्याकडून शुभेच्छा...; रोहित पवारांचं सूचक वक्तव्य

दोघांच्याही दसरा मेळाव्याला माझ्याकडून शुभेच्छा…; रोहित पवारांचं सूचक वक्तव्य

Subscribe

शिवसेनेची ताकद फार मोठी आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा उरणार नाही. स्वतःच्या हिमतीवर ताकद लावून सभा घेतील. दोघांच्याही दसरा मेळाव्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत.

सध्या शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या दसऱ्या मेळाव्याकडेच राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. कोण कुठे दसरा मेळावा घेणार हे निश्चित झाल्यानांतर आता कोणाच्या मेळाव्याला किती गर्दी होणार याकडेही सर्वांचं लोकध लागून राहिलं आहे. उच्च नायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. दसरा मेळाव्या आधी दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे. अशातच ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी जर का राष्ट्रवादीने ताकद लावली तर, मैदान पुरणार नाही असं रोहित पवार म्हणले.

हे ही वाचा – बॅनरबाजी केली म्हणजेच 150 जागा झोळीत आल्या असं नाही; पेडणेकरांचा आशिष शेलारांना टोला

- Advertisement -

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत मिळाली असा दावा भाजपने केला आहे. यायचं संदर्भांत प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणले की, ”राष्ट्रवादीने जरा का उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही”. ”पण राष्ट्रवादीला ताकद लावायची गरज काय?” अशी उलट विचारणा रोहित पवारांनीच केली. शिंदे गटाच्या मेळाव्याला बस मधून लोकं आणली जातील. पण शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला स्वत:हून लोक येतील, असा विश्वास व्यक्त करत रोहित पवारांनी विरोधकांना टोला लागावला.

हे ही वाचा – दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका, शरद पवारांचा सल्ला

- Advertisement -

”शिवसेनेची ताकद फार मोठी आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा उरणार नाही. स्वतःच्या हिमतीवर ताकद लावून सभा घेतील. दोघांच्याही दसरा मेळाव्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत. दोघांचाही दसरा मेळावा मोठा व्हावा. मात्र त्यानंतर लोकहिताची कामं सुद्धा करायला हवीत.जनतेचे प्रश्न सुटावेत अशी अशा नागरिक म्हणून मी व्यक्त करतो”. असंही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरही रोहित पवार म्हणाले, जेव्हा होईल तेव्हा बघूया. तो त्यांच्या जिल्ह्याचा प्रश्न आहे, राज्याचा नाही. लोकांचं मन विचलित व्हावं म्हणूही त्यांनी हे वक्तव्य केलं असावं त्यात काही तथ्यसुद्धा नसेल. या केवळ चर्चा आहेत. एवढ्या चर्चा होतील की आपण थकून जाऊ, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

हे ही वाचा – राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -