घरमुंबईयूट्युबमुळे तरुणीने केली आत्महत्या

यूट्युबमुळे तरुणीने केली आत्महत्या

Subscribe

यूट्युब पाहण्याच्या व्यसनाला बळी पडून एका १५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईत एका १५ वर्षीय तरुणीला व्हिडिओ काढून ‘टिक टॉक अॅप’वर टाकण्यास आजीने विरोध केल्याने त्या तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. मात्र या बातमीने एक नवीन वळण घेतले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या तरुणीला ‘टिक टॉक’चे व्यसन नसून यूट्युबवर व्हिडीओ पाहण्याचं व्यसन लागले असल्याची माहिती समोर आली आहे. थेट स्वर्गात कसे जाता येईल याचा ध्यास या मुलीला लागला होता.

याप्रकराचे व्हिडिओ ही तरुणी पाहायची

भोईवाडा येथील बीडीडी चाळीत श्रावणी घोलप (१५) ही आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. या मुलीला युट्युबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन लागले होते. थेट स्वर्गात कस जाता येईल, याचे व्हिडिओ ती सातत्याने यूट्यूबवर पाहायची आणि त्यातूनच तिने एक अघोरी प्रयोग केला आणि त्यात तरुणीचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. अॅस्ट्रा ट्रॅव्हलर असे या म्हणतात. म्हणजेच तुमच्या आत्म्याला बाहेर बोलवायचे. तसेच काही काळ त्याच्याशी बोलायचं आणि मग पुन्हा आत्मा शरीरात शिरतो, असलं काहीतरी भलतं सलतं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

- Advertisement -

अशी केली आत्महत्या

स्वर्गात जाण्यासाठी श्रावणीने सर्वप्रथम हॉलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तिला आजीने विरोध केला. विरोध केल्यानंतर ती रडत बाथरुममध्ये गेली आणि तेथेच तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला, तरी ती न परतल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर घरातल्यानी बाथरुमकडे धाव घेतली. आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात दाखल केले. या तरुणीवर दोन दिवस उपचार सुरु होते. मात्र दोन दिवसांनी रविवारी रात्री तिने प्राण सोडले. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावरुन सुसाइड नोट मिळाली नसल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली आहे.


वाचा – ‘टिक – टॉक’ला आजीने विरोध केल्याने नातीची आत्महत्या

- Advertisement -

वाचा – टिक टॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -