घरनवरात्रौत्सव 2022पहाटे ५ ते रात्री १० या वेळेत मिळणार भगूरच्या रेणुका देवीचं दर्शन

पहाटे ५ ते रात्री १० या वेळेत मिळणार भगूरच्या रेणुका देवीचं दर्शन

Subscribe

भाविकांना ई-पाससह कोरोना नियमावलीचं करावं लागणार पालन

भगूर – घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्व धार्मिक मंदिरे खुली होत आहेत. भगूरच्या प्रसिद्ध रेणुका माता मंदिरही खुले होणार असून, भाविकांना ई-पासद्वारे पहाटे ५ ते रात्री १० या वेळेत दर्शन मिळणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त व पुजारी देविदास चिंगरे व महेश चिंगरे यांनी दिली.

कोरोना अद्याप पूर्णपणे संपला नसल्याने गर्दी नियंत्रणासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने  http://bhagwatidevitrust.org या वेबसाईटवर ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नोंदणीवेळी १० वर्षावरील आणि ६५ वयाखालील व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. लसीचे दोन्ही डोस घेतलेले किंवा ७२ तासांतील आरटीपीसीआर रिपोर्ट किंवा २४ तासांआधीचा अँटीजेन निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट असलेल्या भाविकांना दर्शन मिळू शकेल. मास्क व शारीरिक अंतर पाळणे बंधनकारक असेल. कोणत्याही प्रकारची फुले, हार, नारळ मंदिरात नेता येणार नाहीत. आरतीवेळीही केवळ ५ भाविकांना प्रवेश मिळेल. याशिवाय मंदिरात १९ सीसीसीटीव्ही कार्यरत असतील. यावर्षी लामरोड युवक व शिवनेरी स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने साजर्‍या करण्यात येणार्‍या १२ वे वर्षी राजस्थानच्या मणिबंध मणिदेविक या शक्तिपीठाचा देखावा सादर केला जाणार आहे. त्याबरोबर माळावरची देवी महालक्ष्मी माता, रविवार बाजार भागातील श्री मरीमाता मंदिर, शितळामाता मंदिर, गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी माता, देवळालीची माताराणी श्रीनी बोर्ड, श्री गणेश सोशल फाउंडेशन येथेही घटस्थापना करून नवरात्रोत्सवास साजरा केला जाणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -