घरपालघरकाँगेसने काढलेली भारत जोडो यात्रा ही द्वेष विरहित विचारधारा पसरविण्यासाठीच

काँगेसने काढलेली भारत जोडो यात्रा ही द्वेष विरहित विचारधारा पसरविण्यासाठीच

Subscribe

परत वाणगाव येथे परतलेल्या कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा महाविकास आघाडी तर्फे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. 

बोईसर :  काँग्रेसने काढलेली भारत जोडो यात्रा ही निवडणुकीसाठी नाही तर, विविधतेतून एकता साधून, समाजा- समाजात आणि जाती- जातीत पसरविण्यात येत असलेली द्वेष भावना संपवून, द्वेष विरहित विचारधारा पसरवून ती भावी पिढीच्या भवितव्यासाठी होती, असे विचार संपूर्ण भारत जोडो यात्रेत सामील झालेले कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी मांडले.
 काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी समवेत, कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत काढलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन तब्बल १४४ दिवसात ४०८०  किलोमीटरचे अंतर पायी चालून, परत वाणगाव येथे परतलेल्या कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा महाविकास आघाडी तर्फे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी,माजी आमदार आनंद ठाकूर होते. यावेळी पालघर जिल्हा काँग्रेस, तसेच महाविकास आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  भारत जोडो पदयात्रा करून परतलेल्या, कॅप्टन सत्यम ठाकूर यांची, ढोल ताशांच्या गजरात  मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर, कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने, आणि पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, पुष्पहार, शाल, मानपत्र,आणि ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी ही, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला  देशात सामाजिक बांधिलकी आणि प्रेम भावना जपण्यासाठी,काँग्रेसने काढलेल्या भारत जोडो यात्रेला मीडियाने फारसी प्रसिद्धी दिली नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणू तालुका प्रमुख अँड, काशिनाथ चौधरी यांनी व्यक्त करून, काँग्रेसने आदिवासी समाजाला खूप काही दिले असल्याची भावना व्यक्त केली. तर भारत जोडो यात्रेत कॅप्टन सत्यम ठाकुर हा एकमेव महाराष्ट्रातील तरुण सहभागी झाल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -