घरराजकारणदेवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा; भाजप नेत्याचे अजब विधान

देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा; भाजप नेत्याचे अजब विधान

Subscribe

यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झाले आहेत. त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांवर जास्त लक्ष केंद्रीय केल्याचे, भाजपचे माजी राज्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हे वक्तव्य केले आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या योजनांबाबत बोलताना, भाजपच्या मंत्र्यांने वादग्रस्त विधान केले आहे. भाजपचे धोरण आणि देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना भाजप आमदाराने एक अजब वक्तव्य केले आहे. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झाले आहेत. त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांवर जास्त लक्ष केंद्रीय केल्याचे, भाजपचे माजी राज्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हे वक्तव्य केले आहे .

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामांचे उद्घाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना भाजप आमदाराने हे अजब वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

BJP leader Subhash Deshmukh statement on Devendra Fadnavis regarding budget 2023 said fadnavis is in favor with ladies

नेमकं काय म्हणाले सुभाष देशमुख?

विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यंदा महिलांवर प्रचंड फिदा झाले आहेत. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण, लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. आता मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. काय माहिती नाहीत, काय यावेळेस महिलांवर फिदा झाले आहेत साहेब. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये सर्वात जास्त लक्ष महिलांवर केंद्रीत करण्यात आले. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले आहे. मुलगी शिकायला गेल्यावर त्याला सुद्धा पैसे द्यायचे ठरवले. त्यानंतर पाचवी – सहावीला गेल्यावर पाच ते सहा हजार रुपये तिच्या खात्यात जमा होतील. मुलगी शहाणी झाल्यावर पैसे, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला 15 किंवा 18 हजार रुपये मिळतील.

- Advertisement -

मुलींची चिंता आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. राज्यातील महिलांच्या गटासाठीदेखील त्यांनी मुंबईत माॅल सुरु केला आहे. महिलांच्या ताब्यात बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भविष्यात सोलापूरच्या बचत गटाच्या उत्पादनांना चांगले दिवस येतील, असे सुभाष देशमुख म्हणाले.

( हेही वाचा: जनतेच्या टॅक्सच्या पैशातून शिंदे-फडणवीसांची जाहिरातबाजी, अजित पवारांचा हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -