घरराजकारणठाकरे कुटुंबातच फूट?; बिंदूमाधव ठाकरेंचा मुलगा निहार शिंदे गटाच्या पाठीशी

ठाकरे कुटुंबातच फूट?; बिंदूमाधव ठाकरेंचा मुलगा निहार शिंदे गटाच्या पाठीशी

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शुभेच्छा देतानाच त्यांच्या गटाला पाठिंबाही दिला.

मुंबई : शिवसेनेत पडलेली फूट आता ठाकरे कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. दिवंगत बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शुभेच्छा देतानाच त्यांच्या गटाला पाठिंबाही दिला. त्यामुळे शिंदे गटाला ‘विश्वासघाती’ म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका मानला जातो.

जूनमध्ये विधान परिषद निवडणूक पार पडताच, शिवसेनेमध्ये ‘उठाव’ झाला. तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ आमदार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत बसण्यास नकार दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले आणि भाजपाच्या मदतीने शिंदे गटाने सरकार स्थापन केले. शिंदे गटात आता शिवसेनेच्या ४० आमदार आहेत. याशिवाय, शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. याशिवाय, शिवसेनेवर दावा करत शिंदे गटाने माजी मुख्य उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई विमानतळाजवळील 48 इमारतींवर मुंबई उच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश, नेमकं कारण काय?

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळापैकी हयात असलेले लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी आणि राज्याचे माजी मंत्री लिलाधर डाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच भेट घेतली होती. तर, त्याआधी २६ जुलैला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता त्यापाठोपाठ बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे सख्खे पुतणे निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

- Advertisement -

हेही वाचा – मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा, एकनाथ शिंदेंविरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -