घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Karnataka : सत्ता आली.. आता वचन पूर्तता; शपथविधी सोहळ्यातच राहुल गांधींनी केली...

Karnataka : सत्ता आली.. आता वचन पूर्तता; शपथविधी सोहळ्यातच राहुल गांधींनी केली मोठी घोषणा

Subscribe

शपथविधी सोहळ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाषण केले. या भाषणांमध्ये त्यांनी पहिल्या मिटींगमध्येच दिलेल्या आश्वासनांची कायदा म्हणून घोषणा करण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव करत काँग्रेसने कर्नाटकात एक हाती सत्ता स्थापन केली आहे. या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून तर डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी 8 मंत्र्यांचा देखील शपथविधी सोहळा पार पाडला. शपथविधी सोहळ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाषण केले. या भाषणांमध्ये त्यांनी कर्नाटकच्या नागरिकांचे आभार मानत मोठ्या घोषणा केल्या. कर्नाटकच्या पहिल्या मिटींगमध्येच या आश्वासनांची कायदा म्हणून घोषणा करण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आले. (Power came.. Now promise is fulfilled; Rahul Gandhi made a big announcement during swearing-in ceremony)

हेही वाचा – Karnataka CM : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री; डी.के. शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

- Advertisement -

शपथविधी सोहळ्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात जनतेचे काँग्रेस पक्षाच्या वतीने धन्यावाद, तुम्ही पूर्णपणे काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. मागील पाच वर्षांपासून तुम्हाला काय अडचणी आल्या हे तुम्ही आणि आम्ही देखील जाणतो. मीडियामध्ये देखील काँग्रेस का जिंकली ते सांगण्यात येत आहे. या विजयाचे कारण फक्त एक आहे आणि ते म्हणजे काँग्रेस पक्ष गरीब, दलित आणि मागासलेल्या नागरिकांसोबत उभा राहिला. आमच्या प्रेमाने द्वेशावर विजय मिळवला. द्वेषाच्या बाजारात कर्नाटकमध्ये प्रेमाचे दुकान उघडले आहे, असे यावेळी त्यांच्याकडून उपस्थितांना सांगण्यात आले.

- Advertisement -

तसेच, कर्नाटकमधील जनतेने भाजपच्या भ्रष्टाचाराला हरवलं आहे. आम्ही खोटी आश्वासने दिली नव्हती. जे बोलतो ते करतो देखील. एक-दोन तासांत कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट मिटींग होईल ज्यामध्ये आम्ही आश्वासन दिलेले पाच कायदे निर्माण केले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली.

“आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो. सरकारचं ध्येय शेतकरी, कामगार, लहान दुकानदार, तरुण यांची रक्षा आणि त्यांच्या भविष्यासाठी काम करणे हे आहे. कर्नाटकच्या नागरिकांनी काँग्रेसला ताकद दिली. हे आम्ही कधीही विसरणार नाही. हे सरकार कर्नाटकच्या लोकांचे आहे. आम्ही मनापासून तुमच्यासाठी काम करू,” असे म्हणत राहुल गांधींनी जनतेचे आभार मानले.

काँग्रेसकडून ‘या’ आश्वासनांची करण्यात येणार पूर्तता…
कर्नाटक निवडणूकीत प्रचार करताना काँग्रेसने पाच कलमी कार्यक्रम आखत पाच कर्नाटकातील पाच आश्वासने दिली होती. जर त्यांचे राज्यात सरकार आले तर कॅबिनेट बैठकीत पाच सुत्री योजना लागू केली जाईल, अशी घोषणा त्यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी केली होती. यामध्ये गृहज्योती, गृह लक्ष्मी, अनन्य भाग्य युवा निधी, शक्ती योजना यांचा समावेश आहे.

काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात ‘गृह ज्योती’ योजनेच्या अंतर्गत कर्नाटकातील सर्व घरांमध्ये 200 यूनिट फ्री वीज देण्याची घोषणा केली आहे. तसेच ‘गृह लक्ष्मी’ या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सगळ्या कुटुंबांतील महिला प्रमुखांना 2 हजार रुपये मासिक मदत देखील देण्याचं आश्वासन देण्यात आले आहे. तसचे ‘अन्न भाग्य’ योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना दरमहा 10 किलो तांदूळ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यासोबतच पदवीधर बेरोजगार तरुणांना ३ हजार रुपये प्रतिमहिना आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांना दीड हजार रुपये प्रतिमहना देण्यात येणार असल्याचे आश्वासन काँग्रेसकडून करण्यात आलेले आहे. या योजनेला युवानिधी योजना असे नाव देण्यात आले आहे. तर शक्ति योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना कर्नाटकातील KSRTC आणि BMTC च्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येईल. काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात सरकारी नोकरदारांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचे देखील आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -