घरराजकारणसंजय राऊतांनी साधला फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, अशा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात...

संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, अशा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात…

Subscribe

"मी फडतूस नाही, काडतूस.. झुकेगा नहीं," असे फडणवीसांकडून विधान करण्यात आलेले आहे. पण त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधत तुम्ही झुकलेलेच आहात, असे म्हंटले आहे.

रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर आता हा वाद विकोपाला गेलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. पण त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मी फडतूस नाही, काडतूस.. झुकेगा नहीं,” असे फडणवीसांकडून विधान करण्यात आलेले आहे. पण त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधत तुम्ही झुकलेलेच आहात, असे म्हंटले आहे.

पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आता मुख्यमंत्री कोणाच्या बाजुला बसलेले आहेत. ज्या मुख्यमंत्र्याला दोन शब्द नीट वाचता येत नाही, बोलता येत नाही. त्यांच्या नेतृत्वात तुम्ही अभिमानाने काम करताय, असे सांगत आहात. पण हे झुकणे नाही तर काय आहे. हे काय ताठ उभे राहणे आहे का? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

महिलांची आत्महत्या, ही का तुमची मर्दानगी
मंत्रालयामध्ये मागील महिन्यात दोन महिलांनी आणि एका पुरूषाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यांतील शीतल गादेकर यांचा २८ मार्चला मृत्यू झाला. त्यानंतर काल मंगळवारी संगीता डावरे यांचा देखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राऊत यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. सरकार समोर येऊन लोक आत्महत्या करत असतील तर ही तुमची मर्दानगी आहे का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. महिला आत्महत्या करत आहेत आणि त्याची तुम्हाला कानोकान खबर नाही, मग तुम्हाला काय म्हणावे, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली.

ईडी, सीबीआय हे बॉडीगार्ड आहेत
ईडी आणि सीबीआय हे बाजूला काढा, मग आम्ही तुम्हाला सांगतो. हे दोन्ही राज्य सरकारचे बॉडीगार्ड आहेत, म्हणून यांची जीभ चराचर चालत आहे. या दोन बॉडीगार्डला बाजूवा काढा. मग काडतूस दाखवतो आम्ही, असा इशारा यावेळी राऊतांकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोझिकोड सहप्रवाशाला पेटवल्याप्रकरणातील आरोपीला रत्नागिरीतून अटक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -