घरराजकारणअजित पवारांचा पूर्णविराम नसून अल्पविराम; दादांच्या भेटीला राष्ट्रवादीचे नेते 'देवगिरी'वर

अजित पवारांचा पूर्णविराम नसून अल्पविराम; दादांच्या भेटीला राष्ट्रवादीचे नेते ‘देवगिरी’वर

Subscribe

मुंबई | “मी राष्ट्रवादीतच राहणार, कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. उगाच अंदाज व्यक्त केले जात आहेत”, असे स्पष्टीकरण देते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत जाण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळा रंगल्या होत्या. यानंतर अजित पवार स्वत: माध्यमांसमोर येऊन सर्व बातम्या वावड्या असल्याचे सांगितले. परंतु, अजित पवार अजूनही नाराज असल्याची माहिती माय महानगरच्या सूत्रांच्या हाती लागली आहे. कारण अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सर्व नेत्यांसोबत दादांची मंगळवारी मध्यरात्री मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे.

या बैठकीत अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे उपस्थित असल्याचे समजते. हे सर्व नेते हे शरद पवार यांच्या अगदी जवळेचे मानले जातात तर सुनील तटकरे हे अजित दादांचे निकटवर्तीय आहेत. या पंचतारांकित हॉटेलमध्ये अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्यात सर्व नेत्यांना यश आलेले नाही. यानंतर आज पुन्हा हे सर्व नेते अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर शरद पवार यांचा संदेश घेऊन गेल्याचे समजते. यामध्ये छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आणि अनिल देशमुख यांनी बुधवारी सकाळी देवगिरी बंगल्यावर अजित दादांशी संपर्क साधला. शरद पवारांनी अजित पवारांसाठी नेमका कोणता संदेश दिला आहे. हे अद्यापही कळू शकले नाही. परंतु, अजित पवारांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे माध्यमांसमोर म्हटले असले तरी ते अद्यापही नाराज असल्यचे माहिती माय महानगरच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला असला तरी हा अल्पविराम असल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे.

- Advertisement -

तसेच सुनील तटकरेंनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर देवगिरी बंगल्यावरून निघाले. परंतु, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख हे सकाळीपासून अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या देवगिरी बंगल्यावर चर्चा सुरू करत असल्याची माहिती मिळाली आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी एकत्र येत सरकार स्थापन केले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकार केवळ ८० तासांत कोसळले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण नये म्हणून शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरल्याचे दिसत आहे. यामुळे आता अजित पवार यांची नाराजी दूर करण्यात कितपत यश मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -