घरक्रीडापाकिस्तानच्या 'या' खेळाडूने टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीला टाकले मागे

पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीला टाकले मागे

Subscribe

आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानच्या (Pakistan) बाबर आझमने (Babar Azam) अव्वल स्थानवर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला मागे टाकत त्याने हा विक्रम रचला आहे.

आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानच्या (Pakistan) बाबर आझमने (Babar Azam) अव्वल स्थानवर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला मागे टाकत त्याने हा विक्रम रचला आहे. विराट कोहली हा १ हजार १३ दिवस अव्वल स्थानावर होता. मात्र त्याचा हाच विक्रम आता बाबर आझमने मोडीत काढला आहे. (Babar Azam surpasses Virat Kohli as world no 1 T20 batter for longest period)

बाबर आझमनंतर भारताच्या इशान किशान या फलंदाजालाही या क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. इशान किशान दोन क्रमांकानी खाली घसरला आहे. तसेच, या दोन जागांवर दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी धेप घेतली आहे.

- Advertisement -

नुकताच भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-२० मालिका झाली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सॅमसन आणि हुड्डा यांनी दमदार खेळी केली. सॅमसन याने ७७ धावा केल्या होत्या. तर हुड्डा याने १०४ धावा करत शतकी खेळी केली होती. त्यामुळे याच खेळीच्या जोरावर या दोघांनी इशान किशानला दोन क्रमांकांनी मागे टाकले.

इशान किशनने आयर्लंड विरूद्धच्या दोन टी-२० सामन्यातील पहिल्या सामन्यात २६ आणि दुसऱ्या सामन्यात ३ धावा केल्या होत्या. त्यामुळे तो टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर घसला आहे. शतकी खेळी करणारा दीपक हुड्डा याने पहिल्या सामन्यातही ४७ धावांची खेळी केली होती. त्याने ४१४ व्या स्थानावरून १०४ स्थानापर्यंत उसळी घेतली आहे. तर ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या सामन्यात ७७ धावांची खेळी केली होती. तो आता आयसीसी टी-२० बॅटिंग रँकिंगमध्ये १४४ व्या स्थानावर पोहचला आहे.

- Advertisement -

आयर्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरी टेक्टरने देखील भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे रँकिंगमध्ये ५५ स्थांनांची उसळी घेतली. तो आता आयसीसी टी-२० बँटिंग रँकिंगमध्ये ६६ व्या स्थानावर पोहचला आहे. त्याने पहिल्या सामन्यात ३९ आणि दुसऱ्या सामन्यात ६४ धावांची खेळी केली होती.


हेही वाचा – भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; पाहा सामना कधी, कुठे खेळवला जाणार?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -