घरक्रीडाIND vs SPN: स्पेनविरुद्धच्या सामन्यांसाठी महिला हॉकी संघाची घोषणा, 'सविता'च्या हाती कमान

IND vs SPN: स्पेनविरुद्धच्या सामन्यांसाठी महिला हॉकी संघाची घोषणा, ‘सविता’च्या हाती कमान

Subscribe

एफआईएच महिला हॉकी प्रो लीगसाठी हॉकी इंडियाकडून २२ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला हॉकी संघाची स्पेनविरुद्ध 26 आणि 27 फेब्रुवारीला 2 सामन्यांची मालिका होणार आहे. भुवनेश्वर येथे संध्याकाळच्या वेळेस मालिका होणार आहे. गोलकीपर सविता भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर डीप ग्रेस इक्काला उपकर्णधार करण्यात आले आहे. संघात यावेळी काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. झारखंडच्या युवा फॉरवर्ड संगाती कुमारीने जूनियर टीममध्ये खेळताना शानदार प्रदर्शन केलं होते. यामुळे आता तिली मुख्य संघातही सामील करण्यात आले आहे.

भारतीय संघात नव्या चेहऱ्यांमध्ये संगातीसोबत आणखी काही खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या सर्वच खेळाडूंनी जूनियर टीमसाठी चांगली खेळी केली होती.

- Advertisement -

भारतीय महिला हॉकी संघाच्या निवडीवरुन संघाचे मुख्य प्रशिक्षक जैनेक स्कोपमॅन म्हणाले की, स्पेनविरुद्धच्या मालिकेसाठी आम्ही उत्साहित आहोत. ओमानवरुन परतल्यानंतर संघाने चांगला अभ्यास केला आहे. निवड करण्यात आलेले 22 खेळाडू स्पेनविरुद्धच्या सामन्यात कसे खेळता येईल यावर लक्ष देत आहेत. जेव्हा तुमच्याकडे चांगले खेळाडूंचा गट असेल तर त्यातून निवड करणे फार आव्हानात्मक होऊन जाते. परंतु युवा खेळाडू आपल्या खेळीमध्ये सुधारणा करत असून चांगले प्रदर्शन करत आहेत.

भारतीय प्रशिक्षकांनी स्पेनविरुद्धच्या संघाबाबत म्हटलं आहे की, स्पेन एक मजबूत संघ आहे. टोक्योमध्ये संघ थोडक्यात आपली जागा निश्चित करण्यापासून चुकला आहे. परंतु संघाने उच्च स्तरावर चांगली खेळी दाखवली. मागील विश्व चषकामध्ये हा संघ कांस्य पदाकापासून थोडक्यात हुकली आहे. स्पेनचा संघ मजबूत संरक्षणासह खेळी करतो. यासाठी आम्ही आमचा वेग, क्षमता आणि मजबूत संरक्षणावर लक्ष केंद्रीत करतोय कारण प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करता येईल.

- Advertisement -

भारतीय संघ

सविता (कर्णधार) बिच देवी खरीबाम आणि रजनी एतिमारपु, दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार) गुरजीत कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, निशा, सलीमा टेटे, सुशीला चानू पुखरंबम, ज्योति, मोनिका, नेहा, नवजोत कौर, नमिता टोप्पो, वंदना कटारिया, शर्मिला देवी, नवनीत कौर, लालरेमसियामी, संगीता कुमारी, राजविंदर कौर, रश्मिता मिंज, अक्षता अबसो ढेकाले, सोनिका मारियाना कुजूर, ऐश्वर्या राजेश चौहान


हेही वाचा : IND VS SL: भारताविरोधात टी-20 सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा, मिस्ट्री गोलंदाजाला संधी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -