Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक भारतीय युजर्सनाही ३० सेकंदापर्यंत ट्विट edit, undo चा पर्याय, इतके रूपये मोजावे...

भारतीय युजर्सनाही ३० सेकंदापर्यंत ट्विट edit, undo चा पर्याय, इतके रूपये मोजावे लागणार

भारतातही ट्विटरवर केलेली एखादी पोस्ट ३० सेकंदापर्यंत editकिंवा undu करता येणार

Related Story

- Advertisement -

ट्विटर भारतात नवीन सर्व्हिस आणत आहे. ज्याचे नाव आहे ट्विटर ब्लू. ट्विटरची ही नवीन सर्व्हिस सबस्क्रिप्शनवर आधारीत असणार आहे. या सर्व्हिसचे डिटेल्स iso अँप स्टोअर वरुन घेण्यात आले आहेत. या नवीन सर्व्हिसमुळे आता भारतातही ट्विटरवर केलेली एखादी पोस्ट ३० सेकंदापर्यंत editकिंवा undu करता येणार आहे. भारतात ट्विटर ब्लूची सर्व्हिस घेण्यासाठी महिन्याला २६९ रुपये मोजावे लागणार आहेत. या ट्विटर ब्लू सोबत आणखी कोणत्या सेवा मिळणार आहेत जाणून घ्या. (Tweet edit, undo option for Indian users up to 30 seconds but Will have to pay)

ट्विट अनडू करण्यासाठी युझर्स अनेक दिवस प्रतिक्षा करत होते. जेणेकरुन ट्विट परत घेऊन रिडर मोडने मोठे ट्विट थ्रेड सहज वाचू शकतील. काही दिवसांपूर्वी ट्विटर ब्लूचा एक स्क्रिनशॉर्ट समोर आला होता. ज्यात ट्विटर ब्लू वर कलर थीमचा ऑप्शनही दिसून आला होता. या नवीन सर्व्हिसमद्ये ट्विटरवर एखादी पोस्ट केल्यावर ३० सेकंदाच्या आत ती अनडू करता येणार आहे. त्याचप्रमाणे ट्विट बुकमार्क करुन देखील ठेवता येणार आहे. जेणेकरुन युझर्सना ते पटकन मिळवता येतील.

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे ट्विटर ब्लू आणि ब्लू टिकचा काहीही संबंध नाही. ज्याप्रमाणे यूट्यूबने जाहिराती शिवाया म्हणजेच Advt Free म्युझिक ऐकण्यासाठी यूट्यूब प्रीमियम आणले आहे. त्याचप्रमाणे ट्विटरही एक नवीन सर्व्हिस आणत आहे. त्यामुळे ट्विटर आता सर्वात जास्त मागणी असेल्या सेवांचीच विक्री करणार आहे. ट्विटरच्या iso व्हर्जन ८.६८ कालच अपडेट झाले आहे. त्यातील अपडेट सर्व लोकांसाठी आहे की निवडक लोकांसाठी ते स्पष्ट केले नाही.


हेही वाचा – आता यूट्यूबच्या माध्यमातून कमवणाऱ्यांना भरावा लागणार टॅक्स, जाणून घ्या नियम

- Advertisement -