घरट्रेंडिंगमोदींच्या ट्विटमुळे काँग्रेसची सोशल मीडिया प्रमुख ट्रोल

मोदींच्या ट्विटमुळे काँग्रेसची सोशल मीडिया प्रमुख ट्रोल

Subscribe

काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया प्रमुख आणि माजी खासदार, अभिनेत्री स्पंदना अर्थात रम्या यांना सध्या ट्विटरवर जबरदस्त ट्रोल केले जात आहे. आज सकाळी ट्विटरवर राम्या यांनी केलेले ट्विट चांगलेच वादग्रस्त ठरत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी एक फोटो ट्विट केला आहे. राम्या या अभिनेत्री असून त्यांचेही जुने फोटो ट्विटरवर अपलोड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला नेटीझन्स प्रत्युत्तर देत आहेत.

काय होते ट्विट

काल गुजरातमध्ये दिमाखदारि सोहळ्यात भारताचे माजी उपप्रंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याच्या पायथ्याशी उभे राहून एक फोटो घेतला होता. सफेद कपड्यांमध्ये मोदींनी अवाढव्य पुतळ्याशेजारी फोटो काढल्यामुळे ते अगदीच लहान दिसत होते. हाच फोटो राम्याने ट्विट करत त्यावर एक कॅप्शन लिहिले. “Is that bird dropping?” असे कॅप्शन लिहिल्यामुळे पंतप्रधान पदावर आरूढ झालेल्या व्यक्तीचा हा अवमान असल्याचा आरोप नेटीझन्स यांनी केला आहे.

हे वाचा – स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये मराठी बेघर

- Advertisement -

… आणि नेटीझन्स भडकले

राम्या राजकारणात येण्यापूर्वी चित्रपटांमध्ये काम करत असे. तिच्या ट्विटवर भडकलेल्या नेटीझन्सनी तिच्या चित्रपटातील काही फोटो ट्विट करत, हे बिचवर पक्ष्यांचे शिट पडलेय का? असा प्रश्न विचारला आहे.

- Advertisement -

 

Ramya troll on twitter

सरदार पटेल लोह पुरूष होते, म्हणून त्यांचा लोखंडाचा पुतळा बनवला गेला. मात्र राहुल गांधीचा पुतळा बनवण्यासाठी गोबर कुठून आणायचे? अशी शाब्दिक कोटी करत काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला आहे.

 

Ramya troll on twitter

तर एका नेटीझन्सने काँग्रेसने जर पुतळा बांधायचा विचार केला तर कसे बांधणार यावर आडाखे बांधून मिम्स तयार केले आहे..

Ramya troll on twitter

कसा आहे हा पुतळा?

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे नाव ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे आहे. पुतळ्याची उंची तब्बल १८२ मीटर इतकी आहे. विशेष म्हणजे हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात झाले. गुजरातच्या वडोदराजवळ असलेल्या नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवरावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं आणखी वैशिष्ट्यं म्हणजे यामध्ये चक्क लिफ्ट बसवण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -