घरट्रेंडिंग'या' अवलियाने केले ३००० मुलींचे कन्यादान

‘या’ अवलियाने केले ३००० मुलींचे कन्यादान

Subscribe

महेशभाई सांगतात की, देशातील अनाथ आणि गरजू मुलींप्रती आम्ही काहीतरी देणं लागतो अशी माझी धारणा आहे. याच भावनेतून मी माझ्या परिने शक्य होईल तितकी सढळ हस्ते मदत करत असतो.

हिऱ्याचे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्या अफाट समाजिक कार्यामुळे आजवर अनेकदा त्यांचे नाव समोर आले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून कधी चारचाकी गाडी तर कधी महागड्या वस्तू देणारे ढोलकिया नेहमी प्रकाशझोतात असतात. मात्र, आता आणखी एका हिरे व्यापाराचं नाव सर्वांच्या चर्चेत आलं आहे. महेशभाई सवाणी असं त्यांचं नाव असून, त्यांनी केलेल्या अनोख्या सामाजिक कार्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा बोलबाला आहे. गरजू आणि अनाथ मुलींचं लग्न लावून देण्याचं पुण्याचं काम सवाणी करतात. मागील ९ वर्षांमध्ये त्यांनी २ हजार ८६६ गरजू व अनाथ मुलींचे लग्न लावून दिले आहे. काल (रविवारी) त्यांनी एकाचवेळी २३१ मुलींचे कन्यादान केले. त्यांच्या या सामूहिक कन्यादानाची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. अशाप्रकारचं समाज कार्य करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक सुख आणि समाधान मिळत असल्याची भावना महेशभाई सवाणी व्यक्त करतात. महेशभाई सांगतात की, देशातील अनाथ आणि गरजू मुलींप्रती आम्ही काहीतरी देणं लागतो अशी माझी धारणा आहे. याच भावनेतून मी माझ्या परिने शक्य होईल तितकी सढळ हस्ते मदत करत असतो.

‘लाडली’ विवाहसोहळा…

धर्म, जाती, प्रांत या सगळ्या सीमा ओलांडून पुढे जात महेशभाई हे समाजकार्य करतात. सवाणी यांनी २३ डिसेंबर २०१८ ला एकूण २३१ मुलींचे कन्यादान केले, ज्यापैकी ६ मुली मुस्लिम होत्या तर ३ मुली ख्रिश्चन धर्मीय होत्या. काल सुरतमधील (गुजरात) पीपी सवाणी विद्या संकूलच्या समोरच्या रघुवीर वाडीमध्ये हा सामूहिक विवाहसोहळा पार पडला. कालचा आकडा पकडल्यास आजवर सवाणी यांच्या हातून एकूण ३ हजार ९७ मुलींचे कन्यादान पार पडले आहे. रविवारी झालेल्या या सामूहिक लग्नसोहळ्याला त्यांनी ‘लाडली’ असं नाव दिलं होतं. हा विवाहसोहळा क वर्षापूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या भूमी नामक मुलीच्या नावावर समर्पित करण्यात आला होता.

- Advertisement -
हजारो अनाथ व गरजू मुलींचा पिता – महेशभाई सवाणी

अन्य जबाबादाऱ्यांचीही पूर्तता…

महेशभाई सवाणी लग्न लावून दिल्यानंतर संबंधित कन्यांच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारीही आपल्या खाद्यांवर घेतात. मुलींचे तसंच त्यांच्या नवऱ्यांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार, कपडेलत्ते यासाठी ते न चुकता आर्थिक साहाय्य करतात. सोबतच विवाहित मुलींना सरकारी योजनांचा लाभ मिळवा यासाठीही ते प्रयत्न करतात. सर्व तरुणींना आपल्या मुली समजून ते त्यांच्या जावयाला रोजगार मिळवून देण्यामध्ये देखील मदत करतात. विशेष म्हणजे ज्यांना आपल्या मुलींचं पालन-पोषण करणं जमत नाही, अशा मुलींना दत्तक घेण्यासाठी त्यांनी अर्जसुद्धा केला आहे.


वाचा: ऑनलाईन ‘Food Apps’वर एफडीएची नजर!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -