घरट्रेंडिंगmountain gorilla : १४ वर्षांपूर्वी जीव वाचणाऱ्या व्यक्तीच्या कुशीतच 'माउंटेन गोरिल्ला'ने सोडला...

mountain gorilla : १४ वर्षांपूर्वी जीव वाचणाऱ्या व्यक्तीच्या कुशीतच ‘माउंटेन गोरिल्ला’ने सोडला प्राण

Subscribe

सोशल मीडियावर एक सेल्फीमुळे रातोरात लोकप्रिय झालेली ‘माउंटेन गोरिल्ला’ नदाकासी आपणा सर्वांनाच आठवत असले. एका पार्कमधील वन रक्षकासह सेल्फी काढल्यामुळे या गोरिल्लाला जगभरात ओळखले जाऊ लागले. नदाकासी ‘माउंटेन गोरिल्ला’चा तो फोटो जगभरात मोठ्याप्रमाणात व्हायरल देखील झाला होता. मात्र दुखदायक गोष्ट म्हणजे कांगोतील विरुंगा नॅशनल पार्कमध्ये या अनाथ माउंटेन गोरिल्ला नदाकासीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेकांना सेल्फीने हसवणारी माउंटेन गोरिल्ला आत्ता जगात राहिली नाही. यातील अधिक दुख:जनक बाब म्हणजे १४ वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने गोरिल्लाचा जीव वाचवला होता, त्याच व्यक्तीच्या कुशीत अनाथ ‘माउंटेन गोरिल्ला’ने प्राण सोडले आहेत. माउंटन गोरिल्ला केवळ १४ वर्षांची होती. मात्र अनेक दिवसांपासून ती एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. आणि यातच तिचा अखेर मृत्यू झाला आहे.

२०१९ मध्ये कांगो विरुंगा नॅशनल पार्कमधील नदाकासी नावाच्या या माउंटेन गोरिल्लाचा वन रक्षक आंद्रे बाउमासोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोने जगभरातील युजर्सची मनं जिंकली होती. मात्र या वनरक्षक बाउमाच्या कुशीतच नदाकासीने अंतिम श्वास घेतला. आंद्रे बाउमा नदाकासीचा केअरटेकर आणि परममित्र होता. आंद्रे बाउमा २००७ पासून नदाकासीची काळजी घेत होता. वन अधिकाऱ्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नदाकासीच्या मृत्यूबाबतची माहिती दिली आहे. या पोस्टसह कॅप्शन लिहिले की, विरुंगा पार्कमधील आमची प्रिय अनाथ माउंटेन गोरिल्ला नदाकासीच्या मृत्यूची खबर देताना खूप दुख: होतेय. ती एक दशकाहून अधिक काळ पार्कच्या सेनक्वेवे केंद्रात देखरेखीखाली होती.

- Advertisement -

विरुंगा वनरक्षकाने नदाकासीला (माउंटेन गोरिल्ला)ला एका सशस्त्र हल्ल्यांतून वाचवले होते. तेव्हा नदाकासी केवळ दोन वर्षांची होती. मात्र तिच्या आईला त्यावेळी मलेशिया हल्लेखोरांनी ठार केले. यावेळी मृत आईच्या शरीराला माउंटेन गोरिल्ला कवटाळून बसली होती. मात्र नदाकासीलाचा जीव वाचवत वनरक्षकांनी तिला नेडेज या अनाथ गोरिल्लासह सेनक्वेकवे सेंटर पार्कमध्ये स्थलांतरित आले. याचवेळी २०१९ मध्ये या पार्कमधील वनरक्षक मँथ्यू शामवूसोबतच्या सेल्फीमध्ये नदाकासी आणि नेडेज दिसले होते. या तिघांचा तो सेल्फी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता.

- Advertisement -

नदाकासीचा शेवटच्या क्षणाचा फोटो बाउमाच्या छातीवर डोका ठेवतानाचा आहे. ज्यात बाउमाने नदाकासीला घट्ट पकडले आहे. यावर बाउमाने सांगितले की, अशा प्रेमळ प्राण्याचे समर्थन करणे आणि त्यांची काळजी घेणे ही सौभाग्याची गोष्ट आहे. विशेषत: अगदी लहान वयात नदाकासीचे दुःख जाणून घेता आले, तो पुढे म्हणाला की, नदाकासीचा गोड स्वभाव आणि बुद्धिमत्तामुळे त्याला महान वानरांशी जोडण्यास मदत केली. बाउमा म्हणाले की, “मला नदाकासीला माझा मित्र म्हणण्यात अभिमान वाटतो. मी त्याच्यावर लहान मुलाप्रमाणे प्रेम केले आणि त्याच्या आनंदी व्यक्तिमत्त्वामुळे प्रत्येक वेळी माझ्या चेहऱ्यावर हास्य आले.” नदाकासी इंटरनेटवर व्हायरल होण्याआधी, तिला अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दाखवण्यात आले होते. ती विरुंगा नावाच्या माहितीपटाचाही एक भाग होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -