मुंबई लोकलमधील लगेज रॅकवर झोपलेल्या तरुणाचा फोटो व्हायरल

man sleeping on the luggage rack of mumbai local goes viral internet
ट्रेंडींग- मुंबई लोकलमधील लगेज रॅकवर झोपलेल्या तरुणाचा फोटो व्हायरल

मुंबईकरांची लाईफ असलेली मुंबई लोकल सतत धावत असते. या लोकलमध्ये घडलेल्या अनेक आठवणींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात. काही व्हिडीओ, फोटो एक मनोरंजनाचा भाग देखील असतात. त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांची मुंबई लोकलसोबतची एक तरी आठवण असतेच. स्थानकांवरील प्रचंड गर्दी असो किंवा ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची रोजची होणारी धडपड असो, सोशल मीडिया अशा व्हिडीओंनी भरलेला असतो. मात्र आता मुंबई लोकल ट्रेनमधील असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स बुचकळ्यात पडलेय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एक व्यक्ती लगेज ठेवण्याच्या रॅकवर झोपलेला दिसतोय. तो व्यक्ती आरामशीरपणे डुलकी घेताना दिसतोय. ट्रेनमधील एका प्रवाशाने हा फोटो क्लिक करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो आता तुफान व्हायरल होत आहे.

 मुंबई लोकल
मुंबई लोकल

हा फोटो रेडिट वर पोस्ट करण्यात आला आहे. जिथे युजर्सकडून लाईक्स आणि शेअर्सचा वर्षाव होत आहे. फोटोमधील व्यक्ती मुंबई लोकलमध्ये सामान ठेवण्याच्या रॅकवर आरामात झोपला असून त्याने चेहरा एका कपड्याने झाकलेला आहे. त्या व्यक्तीने पांढरा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “खोटे बोलणार नाही, मला थोडी जळन होतेय.”

या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत. काहींनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिलेय की, असे करण्याचा विचार त्यांच्या मनात किती वेळा येतो. तर एका यूजरने लिहिले की, “स्वस्त स्लीपर कोच.”