घरटेक-वेकआसूसचा नवा ‘गेमिंग एफ५७०’ आणि ‘व्हिवोबुक १५ (एक्स५०५)’

आसूसचा नवा ‘गेमिंग एफ५७०’ आणि ‘व्हिवोबुक १५ (एक्स५०५)’

Subscribe

आसूसने बुधवारी नवीन एफ ५७० गेमिंग लॅपटॉप आणि आणि वजनाला हलके व्हिवोबुक १५ (एक्स५०५) भारतीय बाजारात सादर केले. ही दोन्ही उत्पादने अगदी नवीन एएमडी रायझेन ५ प्रोसेसर आणि ८ जीबीपर्यंतची डीडीआर ४ मेमरी आणि एएमडी रेडीऑन व्हेगा ग्राफिक्सने सुसज्ज आहेत. ही उत्पादने पेटीएम मॉलवर उपलब्ध असणार आहेत.

आसूस गेमिंग एफ५७० स्मार्ट आणि अत्याधुनिक रीपर ब्लॅक फिनिश लाइटनिंग ब्लू किनारीमुळे चटकन कोणाच्याही नजरेत भरेल असा आहे. २१.९ एमएम प्रोफाइल आणि फक्त १.९ किलो वजनाचा एफ५७० हा कमीत कमी वजनाच्या हाय परफॉर्मन्स लॅपटॉपपैकी एक आहे. हा लॅपटॉप एएमडी रायझेन ५ प्रोसेसरने युक्त असून यावर मल्टीटास्किंग सहजपणे आणि सोयिस्करपणे होते. यामध्ये एएमडी रेडीऑन व्हेगा ८ ग्राफिक्स देखील आहेत ज्यामुळे दोषरहित व्हिज्युअल दिसतात. या लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीज आहेत ज्यामुळे युझर कोणत्याही वातावरणात, अगदी अंधारात देखील टाइप करण्याची सुविधा देतात.

- Advertisement -

व्हिवोबुक १५ (एक्स५०५) हा पूर्वीपेक्षाही अधिक बारिक आणि १.६ किलो वजनाचा आहे. नॅनोएज डिस्प्लेने युक्त व्हीवोबुक १५ हा एका १५.६ इंची फुल-एचडी डिस्प्लेमध्ये मावतो, १४-इंची लॅपटॉपमधील फ्रेमपेक्षा ही किंचित मोठी आहे. आसूस सुपरबॅटरी टेक्नॉलॉजीद्वारा प्रेरित आसूस व्हिवोबुक लिथियम-आयन सिलिंडर बॅटरी कन्फिगरेशनच्या तुलनेत तिप्पट चालणारी बॅटरी देते. शिवाय,आसूस बॅटरी हेल्थ चार्जिंग टेक्नॉलॉजी बॅटरी एक्स्पांशन रेट कमी करते आणि बॅटरीचे एकंदर आयुष्य वाढवते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -