VIDEO : रस्त्यावर भीक मागणारी महिला निघाली CS, अस्खलीत इंग्रजीतच मागते भीक

VIDEO Woman Found Begging in Varanasi Speaks Fluent English, Says She is BSc Graduate
VIDEO : रस्त्यावर भीक मागणारी महिला निघाली CS, अस्खलीत इंग्रजीतच मागते भीक

सध्या सोशल मीडियावर एक भिकारी महिला अस्खलीत इंग्रजी बोलत भीक मागत असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओतील महिलेचे इंग्रजी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर अनेक जण तिच्या इंग्रजी बोलण्यावर फिदा झालेत. इतकचे नाही तर या महिलाबद्दल समोर आलेली माहिती ऐकून काहींच्या पाया खालची जमीनचं सरकली आहे. कारण भिकारी दिसणारी ही महिला कोणी सर्वसाधारण नाही तरी एक उच्च शिक्षित आहे. या महिलेने कम्प्युटर सायन्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

दरम्यान या महिलाचा व्हायरल होणार व्हिडिओ बनारसच्या अस्सी घाटातील असल्याचे म्हटले जातेय. अधिक माहितीनुसार, या व्हिडिओत भीक मागणाऱ्या महिलेचे नाव स्वाती असे आहे. जी दररोज भीक मागून आपले पोट भरते. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, ही महिला एकदम स्पष्ट आणि चांगले इंग्रजी बोलतेय. ती लोकांना आपल्याबद्दल सांगताना म्हणतेय की, तिने दक्षिण भारतातून कम्प्युटर सायन्स या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु तिचे शरीर एका बाजूने पॅरालाइज्ड झाले आहे. अशा परिस्थितीतही पोटाची खळगी भरण्यासाठी ती भीक मागतेय.

स्वातीने सांगितले की, आयुष्यात काहीच ठीक सुरु नव्हते. मुलाच्या जन्मानंतर तिच्या शरीराची डावी पॅरालाइज्ड झाली. अशा परिस्थितीतही कुटुंबियांनी किंवा मित्र -परिवाराने मदत न केल्याने तिच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली. मात्र स्वाती आत्ता लोकांकडे नोकरीसाठी भीक मागतेय. या नोकरीतून पुन्हा चांगले जीवन जगू शकेन अशी इच्छा ती व्यक्त करतेय.