ऑस्ट्रेलियात मानवतेचे दर्शन! हेलिकॉप्टरमधून दिलं प्राण्यांना अन्न

Canberra
Carrots and sweet potatoes airdropped for animals during Australia bushfires. Thank you, says Internet

न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीच्या वणव्यामुळे ऑस्ट्रेलिया होरपळला आहे. याचा सर्वात मोठा फटका न्यू साऊथ या राज्याला बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनएसडब्ल्यू नॅशनल पार्क आणि वाइल्डलाइफ सर्व्हिस यांच्या तर्फे तेथील जंगलात ‘ऑपरेशन रॉक वॉल्बी’ चालविलं जात आहे. यामध्ये ते हेलिकॉप्टरमधून प्राण्यांना गाजर आणि गोड बटाटे टाकले जात आहे. एनएसडब्ल्यूचे ऊर्जा आणि पर्यावरण मंत्री मॅट केन यांनी हेलिकॉप्टमधून प्राण्यांसाठी भाजीपाला टाकतानाचा फोटो शेअर केला आहे.

त्यांनी हा फोटो शेअर करताना हजारो किलो अन्न प्राण्यांसाठी हेलिकॉप्टरमधून टाकलं असल्याची माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे.

तसंच त्यांनी गाजर खातानाचा एका प्राण्याचा फोटो देखील शेअर केला आहे.

 

प्राण्यांना अन्नासाठी मदत केल्यामुळे नेटकरी एनएसडब्ल्यू नॅशनल पार्क आणि वाइल्डलाइफ सर्व्हिस यांच्यावर कौतुकाचा वर्षावर करत आहे. पाहा काय म्हणाले नेटकरी…

सप्टेंबर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियातील या भीषण वणव्याला सुरुवात झाली होती. आतापर्यंत २ हजारहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर जवळपास एक अब्ज प्राण्यांनी जीव गमावला आहे. अजून देखील या वणव्याशी अग्निशामक दल झुंज देत आहे, अशी माहिती आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिली आहे.


हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील वणव्यासाठी विकले न्यूड फोटो; २ दिवसांत कमावले ५ कोटी