घरमहा @४८३६ - शिरुर लोकसभा मतदारसंघ

३६ – शिरुर लोकसभा मतदारसंघ

Subscribe

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघापैकी शिरुर एक महत्त्वाचा मतदारसंघ. घोड नदीच्या किनाऱ्यावर वसलेला शिरुर तालुका हा पुणे आणि अहमदनगरला जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या मतदारसंघात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. भीमा-कोरेगाव, छत्रपती संभाजी महाराज यांची वढू बुद्रुक येथील समाधी, आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आहे. शिरूर तालुक्याला औद्योगिक परिसर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. रांजणगाव-कोरेगाव एमआडीसी याच परिसरात येते. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, हडपसर आणि भोसरी असे प्रसिद्ध असलेले सहा तालुके या मतदारसंघात आहेत. जुन्नर, आंबेगाव सारखा दुर्गम भाग आणि हडपसर, भोसरी सारखा शहरी भाग आहे.

या मतदारसंघाचे राजकारण काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अवतीभोवती फिरत होते. मात्र २००४ साली शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रुपात शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर शिरुरमध्ये पाचर्णे यांच्या रुपाने भाजपने तर जुन्नर येथे मनसेचा एक आमदार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वजन वाढलेले नाराज नेते इतर पक्षात गेल्यामुळे त्यांना तिथे उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले. तसेच हडपसरसारखा शहरी भागात भाजपला चांगली साथ मिळत आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ३६

नाव – शिरुर

- Advertisement -

संबंधित जिल्हा – पुणे

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या (२०१४) – १८ लाख
२० हजार ४१०

पुरुष – ९ लाख ७० हजार ५४६

महिला – ८ लाख ४९ हजार ८४४


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे – राष्ट्रवादी काँग्रेस – ६ लाख ३५ हजार ८३०

शिवाजीराव आढळराव पाटील – शिवसेना – ५ लाख ७७ हजार ३४७

राहुल ओव्हाल – वंचित बहुजन आघाडी – ३८ हजार ०७०

कागदी जमीरखान अफजल – बहुजन समाज पार्टी – ७ हजार २४७

नोटा – ६ हजार ०५१


पुणे मधील विधानसभा मतदारसंघ

१९५ जुन्नर – शरद सोनवणे, मनसे

१९६ आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी

१९७ खेड-आळंदी – सुरेश गोरे, शिवसेना

१९८ शिरुर – बाबुराव पाचर्णे, भाजप

२०७ भोसरी – महेश लांडगे, अपक्ष

२१३ हडपसर – योगेश टिळेकर, भाजप


 

shivajirao adhalrao patil
शिवाजीराव आढळराव पाटील

विद्यमान खासदार – शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना

शिवाजी आढळराव २००४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. शिवाजीराव यांनी लहानपणी पेपर, भाजीपाला विकला आणि यशस्वी उद्योगपती होण्यापर्यंत त्यांचा प्रवास संघर्षमय होता. १९९४ मध्ये ते जागतिक मराठा चेंबर ऑफ असोसिएशनचे कार्याध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील यांच्या मैत्रिच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र २००४ साली त्यांना लोकसभेचे तिकिट देण्यासाठी वळसे पाटील यांनींच विरोध केला. त्यानंतर शिवाजीराव यांनी भीमाशंकर कारखान्याचा अध्यक्षपदाचा राजीनामा देत थेट शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेबांनी संधी दिल्यामुळे आढळराव शिरुरमधून पहिल्यांदा लोकसभेवर गेले. शरद पवार यांचे पुण्यात वर्चस्व असूनही पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघात आढळराव यांनी स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले आहे.


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना – ६ लाख ४२ हजार ८२८

देवदत्त निकम, राष्ट्रवादी – ३ लाख ४१ हजार ३७५

अशोक खंडेभरड, मनसे – ३६ हजार ४३१

सर्जेराव वाघमारे, बसपा – १९ हजार ७७९

नोटा – ११ हजार ९८८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -