घरट्रेंडिंगVideo: मोदींच्या गाडीसमोर बैलांची झुंज

Video: मोदींच्या गाडीसमोर बैलांची झुंज

Subscribe

मोदींच्या ताफ्यासमोर अचानकच हे दोन बैल आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत या बैलांना बाजूला केलं आणि ताफा पुढे रवाना झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना एक गजब घटना घडली. त्यावेळी मोदी वाराणसीमध्ये होते. मोदींच्या गाड्यांचा संपूर्ण ताफा रस्त्यातून जात असताना अचानक थांबला. याचं कारण म्हणजे भर रस्त्यात चक्क दोन बैलांची झुंज लागली होती आणि तीही मोदींच्या ताफ्यांसमोर. बैलांच्या या आपापसातील झुंजीमुळे मोदींच्या ताफ्यातील सगळ्याच गाड्या काही काळ रस्त्यात अडकडून राहिल्या होत्या. त्यावेळी मोदींचा ताफा केंट रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होता. प्रत्यक्षात पंतप्रधानांचा ताफा अडवून धरणाऱ्या या बैलांची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सहसा पंतप्रधानांसारख्या उच्च अधिकाऱ्यांचा ताफा ज्या रस्त्यावरुन जाणार असतो, त्या रस्त्यावर सुरक्षेचा सगळा बंदोबस्त आधीच केलेला असतो. मात्र, हे दोन बैल अचानकच ताफ्यासमोर आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. अखेर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत या बैलांना बाजूला केलं आणि मोदींचा ताफा केंट रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला.

पाहा या घटनेचा व्हिडीओ :


सौजन्य- Livenews

- Advertisement -

विकास कामांचा आढावा

उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी हा दौरा केला होता. यासंबंधी चर्चा करण्यासाठी मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची भेच घेतली. बैलांच्या झुंजीची घटना घडली त्यावेळीही मोदींच्या गाडीच्या मागच्या सीटवर योगी आदित्यनाथ बसले होते. दरम्यान झेड प्लस सिक्युरिटी असताना ताफ्यांसमोर अशाप्रकारे बैल आलेच कसे? असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -