घरमुंबईभाजपच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाचा निषेध; काँग्रेसचा 'हा' कार्यक्रम!

भाजपच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाचा निषेध; काँग्रेसचा ‘हा’ कार्यक्रम!

Subscribe

भाजपनं बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आता काँग्रेसनं देखील त्याला प्रत्युत्तर देणारा दुसरा कार्यक्रम मुंबईतल्याच टिळक भवन येथे आयोजित केला होता.

बुधवारी भाजपच्या मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर पिचड, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक अशा दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसकडून देखील त्याला प्रत्युत्तर दिलं जाणं साहजिकच होतं. तसंच उत्तर काँग्रेसकडून देण्यात आलं असून हा कार्यक्रम गरवारे क्लबमध्ये सुरू असतानाच दुसरीकडे त्याचवेळी टिळकनगरमध्ये काँग्रेसचा ‘लाडू वाटपा’चा कार्यक्रम सुरू होता. यावेळी, काँग्रेस-राष्ट्रवादीमधून बाहेर पडणाऱ्या अनेक बड्या आणि ज्येष्ठ नेत्यांमुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. असं जरी असलं पक्षात अजूनही जीव आहे. त्याच जोरावर पक्ष मोठा होईल, अशीच भावना काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत होते. गरवारे क्लबमध्ये झालेल्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्याच निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील टिळक भवन येथे लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


हेही वाचा – पक्षप्रवेश झाले, ताकद वाढली; आता युतीवर वाचा काय म्हणतात मुख्यमंत्री!

घाण साफ झाली – राजू वाघमारे

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी ‘काँग्रेस पक्षाची घाण साफ झाली’ असल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी एकमेकांना लाडू भरवत, फटाके फोडून कार्यकर्त्यांनी एकाच वेळी आनंद देखील साजरा केला आणि निषेध देखील करण्यात आला.

काँग्रेस पक्षात दुःखाचं वातावरण असल्याची अफवा पसरवली जात आहे. पण, कोणालाही दु:ख झालेलं नाही. काँग्रेस पक्षातून गद्दारांची घाण साफ झाली आहे. त्यामुळे आम्ही लाडू वाटले. काँग्रेसच्या नेतृत्वावर आणि विचारधारेवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीत आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आजच आमची दिवाळी, कारण आमच्यातली घाण ही साफ झाली आहे.

डॉ. राजू वाघमारे, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

- Advertisement -

कॉंग्रेसची साचलेली घाण साफ झाली , पक्ष बदलणार्या नेत्यांचा कॉंग्रेसकडून निषेधध

कॉंग्रेसची साचलेली घाण साफ झाली , पक्ष बदलणार्या नेत्यांचा कॉंग्रेसकडून निषेध

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜುಲೈ 31, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -