घरमनोरंजनजॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते-२' चे पोस्टर रिलीज

जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते-२’ चे पोस्टर रिलीज

Subscribe

२ ऑक्टोबर २०२० रोजी होणार सत्यमेव जयते-२ प्रदर्शित

गेल्या वर्षात आपल्या अॅक्शन ड्रामासह रेकॉर्ड ब्रेक करणारा दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरीचा चित्रपट सत्यमेव जयते-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता जॉन अब्राहम सारखे तगडे स्टारकास्ट असणाऱ्या या आगामी चित्रपट सत्यमेव जयते-२ चा फर्स्ट लूक गांधी जयंतीच्या एक दिवस आधीच रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये जॉन एका पोलिसाच्या वर्दीत दिसत असून त्याच्या छातीवर तिरंगा दिसतअसून हा तिरंगा त्याच्यातील देशभक्ती असल्याचे दर्शवतो. या पोस्टरवर भारताच्या राष्ट्रगीताचे ‘जन गण मन’ हे तीन शब्द लक्ष वेधून घेताना दिसताय.

- Advertisement -

या चित्रपटात अभिनेता जॉनसह अभिनेत्री दिव्या कुमार खोसला देखील दिसणार आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार (टी-सीरीज), मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी, निखिल आडवाणी (एम्मी एंटरटेनमेंट) द्वारा निर्मिती असलेला हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हा चित्रपट भ्रष्टाचार मुक्त करणाऱ्या पोलीसाच्या कथेवर आधारलेला चित्रपट आहे. या चित्रपटात मनोज बाजपेई आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -