घरताज्या घडामोडीकरोनाची अफवा, महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल!

करोनाची अफवा, महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल!

Subscribe

करोना व्हायरससंदर्भात अफवा पसरवणाऱ्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. उस्मानाबादमधील एका अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना व्हायरसचा चीनसोबतच जगातल्या अनेक देशांमध्ये फैलाव झाला आहे. भारतातल्या दिल्ली, केरळ या राज्यांमध्ये आत्तापर्यंत करोनाचे रुग्ण आढळले होते. आता पुण्यात देखील करोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आधीच भितीच्या वातावरणात असलेल्या लोकांमध्ये अफवा पसरवून अधिक भिती निर्माण करू नये, यासाठी अफवा न पसरवण्यासंदर्भात सरकारकडून आवाहन केलं जात होतं. मात्र, तरीदेखील असा अफवा पसवल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात करोना व्हायरसबाबत अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबादमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांची तक्रार

उस्मानाबादमध्ये एका व्यक्तीने जिल्ह्यात करोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण आढळल्याचा दावा केला होता. यासाठी त्याने एका वृत्तवाहिनीचा फोटो देखील व्हायरल केला होता. मात्र, प्रत्यक्षात उस्मानाबादमध्ये करोना व्हायरस अस्तित्वातच नाही. त्यामुळे, जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी या प्रकारावरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर उस्मानाबादमधल्या व्हायरसचं वृत्त बरंच व्हायरल झालं होतं.

- Advertisement -

हेही वाचा – करोनाला घाबरून पुण्यात IT कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’!

पुण्यात आढळले २ करोना रुग्ण

दरम्यान, महाराष्ट्रात पहिल्यांदाच करोना व्हायरसचं अस्तित्व दिसून आलं आहे. पुण्यात करोनाचे दोन रुग्ण आढळले असून त्यांच्यावर पुण्यातल्या नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे रुग्ण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४० जणांसोबत दुबईहून परतले आहेत. त्यामुळे आता त्या ४० जणांविषयी देखील प्रशासनाने सतर्कतेची पावलं उचलली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -