घरताज्या घडामोडीनाशिक जिल्ह्यात 89 विदेशी नागरीकांवर आरोग्य विभागाची नजर

नाशिक जिल्ह्यात 89 विदेशी नागरीकांवर आरोग्य विभागाची नजर

Subscribe

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी नागरीकांविषयी सतर्कता बाळगली जात असताना जिल्ह्यात आलेल्या 89 विदेशी व्यक्तींवर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे. त्यांच्या घरी जावून नियमित आरोग्य तपासणी केली जात असून, त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे ज्या भागात या व्यक्ती राहतात तेथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामीण भागातील अनेक लोक नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई या सारख्या शहरात राहतात. त्यांनी गावाकडे धाव घेतल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात साधारणत: 680 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. तसेच तालुका स्तरावरील 40 ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमार्फत आरोग्य सेवा पुरवली जाते. जिल्ह्यात अद्याप एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीदायक वातावरण नसले तरी त्यांना आरोग्याच्या अन्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत खासगी रुग्णालयांनी आपली सेवा सुरु ठेवणे अपेक्षित असताना त्यांनी आपली दवाखाने बंद ठेवल्यामुळे हे रुग्ण आता शासकीय दवाखान्याकडे वळले आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांत तीन पटीने संख्या वाढल्याचे दिसून येते. गेल्या फेब्रवारी महिन्यात सुमारे अडीच लाख नागरीकांवर उपचार करण्यात आले. साधारणत: हा आकडा एक ते दीड लाखापर्यंत असतो. मार्च महिन्यात तो तीन लाखांवर पोहोचण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

.;
Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -