घरCORONA UPDATECorona Live Update: वसई - विरारमध्ये गेल्या २४ तासांत २९२ नव्या कोरोना...

Corona Live Update: वसई – विरारमध्ये गेल्या २४ तासांत २९२ नव्या कोरोना रूग्णांची वाढ

Subscribe

ठाण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.


देशभरासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३४८ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १४४ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ३,००,९३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ३०६ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ६५ हजार ६६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -


मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत १ हजार १५२ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजवर ७० हजार ४९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २४ हजार ०३९ हे अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -


वसई – विरारमध्ये गेल्या २४ तासांत २९२ नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. तर पाच जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९ हजार ५७६ इतक्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.


गडचिरोलीत नक्षलविरोधी सुरक्षा दलात तब्बल ७२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण २०४ CRPF-SRP जवानांना संसर्ग झाला असून आतापर्यंत १२०० हून अधिक जवान कोरोनाबाधित झाले आहेत.


भारताचा रिकव्हरी रेट ६३ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात देशभरातील ३ लाख ६१ हजार ०२४ जणांचे कोरोना चाचणीसाठी सॅम्पल्स घेण्यात आले आहेत.


एकीकडे ठाण्यात लागू असलेला लॉकडाऊन संपण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक असताना ठाण्यात कोरोनाचा फैलाव मात्र अजूनही ओसरायचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीचा विचार केला, तर ठाण्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाण्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५४७ इतका झाला आहे. याशिवाय ३४२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, दुसरीकडे एकाच दिवसात १२७७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे ही प्रशासनासाठी आणि ठाणेकरांसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे. सध्या ठाणे शहरमध्ये एकूण ५ हजार ३२४ रुग्ण उपचार घेत आहेत, तर एकूण ९ हजार ६४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ठाण्यात १८ जुलैपर्यंत एकूण ६७ हजार ६१६ चाचण्या घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


भिवंडी शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचणीच्या दहा हजार किट्स भिवंडी महानगरपालिका प्रशासना कडे सुपूर्द केल्या नंतर शहरात चाचणी घेण्याचे प्रमाण वाढवण्यात आले असून नुकताच चॅलेंज ग्राऊंड या ठिकाणी पाचव्या रॅपिड अँटिजेन चाचणी केंद्राचा शुभारंभ महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते स्थानिक जेष्ठ समाजसेवक गुलाब अमिचंद जैन रामेश्वरजी श्रीनिवास कांकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

रॅपिड अँटिजेन चाचणी

पुढील पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही. जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी आज काढला आदेश. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे ई-पासही बंद केले.


राज्यमंत्री शंकरराव गडाख क्वारंटाईन

राज्याचे जलसंधारण (minister) मंत्री (shankarrao gadakh) शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याने मंत्र्यांनी स्वतःच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती त्यांनी स्वतः (tweet) ट्विट करून दिली आहे. शंकरराव गडाख यांनी ट्विटरवरू म्हटले आहे की. मी क्वॉरंटाइन झालो असून कुणीही मला भेटायला येऊ नये. शंकरराव गडाख यांच्या पत्नी आणि (nevasa) नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती (sunita gadakh) सुनिताताई गडाख यांची काल कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले ४७५ रुग्ण, कल्याण (पू) : ९५, कल्याण (प) : १३१, डोंबिवली (पू) : १४६, डोंबिवली (प) : ६८, मांडा-टिटवाळा : ११, मोहना : २३, पिसवली : १. आतापर्यंत ६१२१ रुग्णांवर उपचार सुरू. आतापर्यंत ९०१९ रुग्णांना डिस्चार्ज. २४ तासांत ९ जणांचा मृत्यू. आतापर्यंत २४० रुग्णांचा मृत्यू. केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती.


औरंगाबादमध्ये जनता कर्फ्यू वाढणार नाही

औरंगाबादमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लागू केली होती. ही संचारबंदी १० जुलै ते १८ जुलै या कालावधीत लागू करण्यात आली असून आज या संचारबंदीचा शेवटचा दिवस असताना औरंगाबादमध्ये जनता कर्फ्यू वाढणार नसल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. दरम्यान लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीनंतर हा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (सविस्तर वाचा)


कोरोनावर रामबाणं औषध

जगभरात गेल्या सात महिन्यांपासून (covid 19) कोरोनाने थैमान घातले असून त्यावरील लस शोधून काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कित्येक देशांमध्ये विविध स्तरावर कोरोनावरील औषधांच्या चाचण्या होत असून या दरम्यान ब्रिटनमधून आशा पल्लवीत करणारी बातमी येत आहे. ब्रिटनमध्ये (dexamethasone) ‘डेक्सामेथासोन स्टेरॉयड’ च्या (Large randomized clinical trial) ‘लार्ज रँडमाइज्ड क्लिनिकल ट्रायल’ चा अंतिम अहवाल समोर आला असून शुक्रवारी आलेल्या या अहवालामध्ये या औषधामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. (सविस्तर वाचा)


जगात झपाट्याने होतोय संसर्ग

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसागणिक झपाट्याने वाढ आहे. (reuters tally) रॉयटर्स टॅली यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी जगभरातील (covid 19) कोरोनाबाधितांची संख्या १४ कोटीहून अधिक झाल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नव्हे तर १०० तासांत कोरोनाबाधितांचा विक्रमी आकडा म्हणजेच १० दहा रूग्ण वाढ झाल्याचीही माहिती मिळत आहे. कोरोनाचा पहिला रूग्ण (china) चीनमध्ये जानेवारी २०२० ला आढळून आला होता. त्यांना सलग तीन महिने कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख इतका झाला होता. मात्र कोरोना रूग्णांची संख्या १३ कोटीहून १४ कोटीपर्यंत पोहोचण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी गेला. १३ जुलै रोजी (world) जगात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ कोटी होती. तर १७ तारखेला ही १४ कोटीहून अधिक झाल्याचे समोर येत आहे. (सविस्तर वाचा)


कल्याण ग्रामीण मधील वरप गावामध्ये असलेल्या राधास्वामी सत्संगाच्या भल्यामोठ्या शेडमध्ये २०० बेड्सचे आयसीयू कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.जागा विस्तीर्ण असल्याने ते ४०० बेड्सचे करून त्यात उल्हासनगरसाठी बेड्स राखीव ठेवावेत असा प्रस्ताव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासमोर ठेवला आहे.


जुलैअखेर बाधितांची संख्या २४ हजार होईल

पुण्याभोवतीचा कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन करुन देखील कोरोना विषाणूची परिस्थिती जैसे थै असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती कशी आटोक्यात आणायची हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर ‘आ’वासून उभा आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. जुलै अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत सर्वाधिक ३४ हजार ८८४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ६७१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहोचला असून मृतांचा आकडा २६ हजार २७३ झाला आहे. तसेच आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३ लाख ५८ हजार ६९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईमधील रिकव्हरी रेटमध्ये ७० टक्के झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनावर मात कराऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रिकव्हरी रेटमध्ये ‘मुंबई’ अव्वल ठरली आहे. (सविस्तर वाचा)


एका पोलीस अधिकाऱ्यासह २८ कैद्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.


राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३०८ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २५८ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ९२ हजार ५८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात २ हजार २१७ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ६० हजार ३५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -