घरताज्या घडामोडीधनंजय गावडेंबाबत किरीट सोमय्यांनी केला खुलासा

धनंजय गावडेंबाबत किरीट सोमय्यांनी केला खुलासा

Subscribe

धनंजय गावडेंबाबत किरीट सोमय्याने केला खुलासा.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो ज्या मनसुख हिरेन या व्यावसायिकाची होती त्याचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी मुंब्रा खाडीत सापडला. यामुळे या प्रकरणामागचं गूढ वाढलं आहे. तसेच या प्रकरणामुळे आता सरकारला धारेवर धरले जात असून या प्रकरणात वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक धनंजय गावडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. कारण मनसुख हिरेन हे धनंजय गावडे यांना शेवटचे भेटले होते. दरम्यान, त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे खोटे असल्याचे गावडे यांनी सांगितले. तसेच मी केलेल्या गुन्ह्यातून मला सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिलेला आहे. आतापर्यंत झालेल्या ट्रायलमध्ये कोणतेही गुन्हे सिद्ध झालेले नाहीत आणि कोणत्याही कोर्टाने दोषी देखील ठरवलेलं नाही, असे म्हणत गावडे यांनी आपले मत मांडले मात्र, याबाबत किरीट सोमय्याने खुलासा केला आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

धनंजय गावडे यांच्यावर बलात्कार, खंडणी आणि जमीन याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २०१६ मध्ये आयकर विभाग आणि ईडीने त्यांच्या घरी छापे देखील मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून ४० लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. मात्र, माझ्यावर जे नऊ गुन्हे दाखल केले होते, त्याच्यातून माझी मुक्तता झाल्याचे गावडे म्हणाले त्यावर किरीट सोमय्या यांनी ट्विट करत धनंजय गावडेवर लावण्यात आलेले नऊ अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टने २१ जानेवारी रोजी फेटाळले आहेत. त्यामुळे अटकेनंतर कोणत्याही प्रकारची मदत दिली जाऊ शकत नाही, असे कोर्टाचे म्हणणे आहे. त्याबाबतची कागदपत्रे त्यांनी पोस्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय गावडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


हेही वाचा – हिरेन मृत्यूप्रकरण: कोणालाही अशापद्धतीने आयुष्यातून उठवू नका – धनंजय गावडे


Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -