घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत मृतांच्या संख्येत घट, तर २४ तासात ६...

Mumbai Corona Update: मुंबईत मृतांच्या संख्येत घट, तर २४ तासात ६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Subscribe

रविवारी कोरोना अहवालात बाधित रुग्णांची संख्या ९ हजार ९८९ एवढी होती. तर सोमवारच्या अहवालात रुग्णांची संख्या ६ हजार ९०५ एवढी नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच रुग्णांच्या संख्येत ३ हजार ८४ ने घट झाली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोनाची आकडेवारी १० हजारांच्या घरात पोहचली होती. मात्र मुंबईसह राज्यात केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ६ हजार ९०५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. १० हजारांपर्यंत गेलेल्या रुग्णसंख्येत थेट ३ हजाराने फरक पडला आहे. रविवारी कोरोना अहवालात बाधित रुग्णांची संख्या ९ हजार ९८९ एवढी होती. तर सोमवारच्या अहवालात रुग्णांची संख्या ६ हजार ९०५ एवढी नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच रुग्णांच्या संख्येत ३ हजार ८४ ने घट झाली आहे. मुंबईत आज ९ हजार ३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आज एकूण ३९ हजार ३९८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या रविवारच्या अहवालात ५८ होती. मात्र सोमवारच्या अहवालात कोरोना मृतांची संख्या ४३ वर आली आहे. त्यामुळे मृत रुग्णांच्या संख्येत १५ ने घट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन व कडक निर्बंधचा रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, रविवारच्या अहवालानुसार, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही ८ हजार ५५४ एवढी होती, तर सोमवारच्या अहवालानुसार कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९ हजार ३७ एवढी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण बरे झाल्याच्या संख्येत ४८३ ने घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र रुग्णांच्या चाचण्यांची संख्या ही रविवारच्या अहवालानुसार ५२ हजार १५९ एवढी होती, तर सोमवारच्या अहवालात चाचण्यांची संख्या ही ३९ हजार ३९८ एवढी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.

- Advertisement -

मुंबईचा आतापर्यंत विचार केला असता मुंबईत आतापर्यंत ५ लाख २७ हजार ११९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत मुंबईत ४ लाख २३ हजार ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईत ९ हजार २६७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबई आतापर्यंत १२ हजार ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ८५ सक्रिय कटेंनमेंट झोन आहेत. तर ९१९ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकाही आता सज्ज झाली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई महापालिकेने Action Plan तयार केला आहे. येणाऱ्या ७ दिवसात मुंबई महापालिका १ हजार १०० नवे कोविड सेंटर कार्यान्वित करणार आहे. महापालिकेच्या या Action Planचा लोकांना मोठी फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे दोन दिवसात सण येत असल्याने लोकांनी घरात राहून सण साजरे करावे, असे आवाहनही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Remdesivir Injection: पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी नातेवाईकांची वणवण, महापालिका रुग्णालयात मोठी गर्दी

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -