घरमनोरंजनसलमान खानच्या 'राधे' चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज!

सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज!

Subscribe

ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल.

अभिनेता सलमान खानच्या आगामी  ‘राधे’ चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे रंगत आहे. जेव्हापासून दर्शकांनी ट्रेलरमध्ये ‘राधे’ चित्रपटातील   टायटल ट्रॅक सॉन्ग ऐकले आहे, त्यांच्या उत्साहाला सीमा राहिली नाही. एक दिवस आधी, चित्रपटाच्या ज्युक बॉक्ससोबत गाण्याचे ऑडियो प्रदर्शित करण्यात आले होते त्याला देखील दर्शकांची शानदार प्रतिक्रिया मिळत आहेत.  आणि आता, चाहत्यांसाठी  आनंदाची बातमी आहे की चित्रपट निर्मात्यांनी ‘राधे: युवर मोस्ट वांटेड भाई’चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज  केले आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान आणि दिशा पटानी गाण्यातील थिरकायला लावणाऱ्या संगीतावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सलमान खान डैपर लुकमध्ये दिसणार असून सलमान-दिशाची जोड़ी या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

गाण्यामध्ये  सलमान खान स्टाइल एंटरटेनमेंटचे ते प्रत्येक गुण आहेत जे चाहत्यांच्या हृदयात आपली विशेष जागा निर्माण करतील. सलमान खान डॅशिंग अंदाजात दिसत असून हा ट्रॅक चित्रपटातील राधेच्या व्यक्तिरेखेला हुबेहूब सादर करतो आहे. या आधी प्रदर्शित झालेली गाणी ‘सिटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ आधीपासूनच आपली जागा चाहत्यांमध्ये बनवली आहे आणि आता, टायटल ट्रॅक देखील यामध्ये सामील होण्यास सज्ज आहे.  सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी  श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: युवर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर ‘पे-पर-व्यू’ सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल.


हे हि वाचा – ‘दृश्यम 2’ चित्रपटाच्या घोषणेनंतर निर्मात्यांमध्ये अधिकृत हक्कावरुन झाला वाद

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -